उन्हाळ्यातच फुलनारे फूल म्हणजेच मे फ्लॉवर ला काल आमच्या घरी फूल आले.
झाडाला फूल येण्यात माझे काही योगदान नाही, अमरावतीवरून झाडाचे कंद आनणे, ते कुन्डीत लावणे व त्याला पाणी घालणे याशिवाय, अधेमधे बटाट्याची साल घालणे बस इतकेच
पण तरीही त्या झाडाला फूल आलेले बघून खूप आनंद होत आहे.
नवनिर्मिती चा आनंद काही वेगळाच असतो.
त्या झाडाला काय म्हणतात हे माहिती नाही.
मे महिन्यात त्याला फूल येतात म्हणून मे फ्लॉवर म्हणायचे.
महाजालावर खूप शोध शोध शोधले आणी एकदाचे माज्या मे फ्लॉवर चे नाव कळाले : Blood Lily, Football Lily, Powderpuff Lily
This slideshow requires JavaScript.



रोप रुजविण्याची नुसती कल्पना मनात आणणे सोपे नाही.
नवीन काही केल्याचा, शिकल्याचा आनंद काही वेगळाच असतो. आयुष्यातल्या इतर कामा मूळे त्याला जास्त वेळ देऊ शकत नसलो तरी नवीन काही शिकण्याची इच्छाशक्ती असणं , ते ENJOY करणं महत्वाच.
बाकी मे फ्लोवर दिसतंय खरच खूप सुंदर ….