लग्नाला 4-5 वर्ष झाल्यावर, प्रेम व्यक्त करायची समीकरणे बदलतात.दिवसातुन दहा वेळा  love you म्हणने म्हणजे प्रेम नसुन ते अव्यक्तपणे व्यक्त करणे म्हणजे प्रेम.

प्रेम व्यक्त होते स्पर्शातुन, शब्दातुन, नजरेतुन, स्वयंपाकाला दिलेल्या दादेतुन, छान दिसत आहेस/आहात या शब्दांतुन, जपुन जा, लवकर या/ये या शब्दातुन.

यानेच

लग्न मुरल्यासारखे वाटते, l love you /I  miss you  सारखे उथळ उथळ नाही

पिल्लायन 4

Posted: मार्च 3, 2017 in सहजच

मोठ्या पिल्लाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु होता.पिल्लाला स्टेजवर बघुन अगदी कभी खुशी कभी गम च्या काजोलसारखे वाटायला लागले.काय करू अन काय नको, असे झाले होते.सभ्यतेचा बुरखा फाडुन, मस्त शिटी वाजवावीशी वाटली.सोबतच मनात भावनांची दाटी झाली होती, रडायला पन येत होते

माझं पिल्लु किती पटकन मोठे झाले

मी त्याच्या आजारात जागरण करायची अन माझी तब्येत चांगली नसली की तो पाय दाबुन देतो, देवाचा अंगारा लावतो. अशा वेळेस खुप अभीमान वाटतो त्याचा.

एकंदरीत पिल्लुचा कार्यक्रम बघतांना मी वर्तमानकाळातुन भुतकाळात गेले होते व टाळ्यांच्या कडकडाटाने वास्तवात आले.

आनंदाच्या डोही आनंद तरंग…