आवडलेल्या कविता

मला आवडलेल्या निवडक कविता मी इथे देत आहे….

सांगा कसं जगायचं

सांगा कस जगायचं?

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

—मंगेश पाडगांवकर

यात काही पाप नाही
सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

–मंगेश पाडगावकर

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

कुसुमाग्रज

वेळच नसतो….

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो

वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो

ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून त्यांनाहसण्यासाठी वेळच नसतो

प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?

नशिबी असते जेजे, घडते तेते तेव्हा
नशिबी माझ्या घडण्यासाठीवेळच नसतो

अजबचालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो

कवी अजब.

Advertisements
प्रतिक्रिया
 1. inkblacknight म्हणतो आहे:

  वा वा सुरेख ! बर्याच दिवसानी ह्या कविता वाचल्या. पुनः प्र्त्ययाचा आनन्द मिळाला …

 2. su म्हणतो आहे:

  बर्याच दिवसानी ह्या कविता वाचल्या. पुनः प्र्त्ययाचा आनन्द मिळाला …

 3. sarani chitre म्हणतो आहे:

  Karech Aaushat kahi tari karayalach have ase mala ya asadharan locan kade baghun nehemich vatate.jase varil kavincha kavita vachu attavatat te diwas . ki mihi ya asaadharn kavin madhe kivha sahitikan madhe vadale rahile tyance jaganech ekun vegalech asatate. pratech goshtina te kavitetun bhavana deun pragat karatat. tech tyance motthe pan.
  Kare tar sagalech great astatach pan yashacha shikharavar jaushakat nahit. karan nashib,mehanat, pathimbahi mhatavacach nahi ka.
  Tar aso ,Mala matra 60 uttaratil ( 60 vha dashakatil kavi kadhi gretcha vatatat. jabardasrt anubhav jivanatil. sagalech changale vaeet,anubhav te sahaj sundar sopya padhatine mandane.tase tya adiche wa naterache hi sahitic greatch .
  Ekun mi sahitic jagata baddal aaj lihile ahe. karn varacha kavita vachun .
  sagalyanach dirgh aausha labho. aanadat sukhat rahot. hich sadaechha.
  sagalya sahitikana, artistna,ya mana pasun sadaechha.
  Sarani chitre

 4. pratibha म्हणतो आहे:

  koop sundar………….

 5. shital wani म्हणतो आहे:

  khupch sundar ya kavita.man ramal

 6. shital anant gawade म्हणतो आहे:

  apratim kavita

 7. shital anant gawade म्हणतो आहे:

  apratim khupach chhan

 8. Rajesh Kadam म्हणतो आहे:

  फार दिवसांनी वाचण्यासारख काहीतरी मिळाल

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s