उदरभरण नोहे

आपला खराब Mood 😦 चांगला करायची प्रत्येकाची आपली आपली वेगळी तरहा असते.
जसे कुणी बाहेर फिरायला जातो तर कुणी TV बघतो तर कुणी Net Surfing ……..
मला जर विचारले की तुझा mood कसा चांगला करायचा तर उत्तर अगदी सोपे आहे मला काहीतरी खायला (शक्यतो गोड) द्यावे
अर्थात माझ्या mood चा मार्ग माझ्या पोटातून जातो.
त्यामुळे इथे खण्याबद्दलच लिहिणार आहे 🙂

उपवास असला म्हणजे काय खावे 🙂  हा मला पडणारा यक्ष प्रश्न असतो.
कारण साबूदाणा खिचडी आवडत नाही,भगर भात आवडत नाही,तळलेले पदार्थ नको रे बाबा…. त्यामुळे काय खायचे तेच कळत नाही (आता उपवास असला की काहीही
खाउ नये हे पटते पण ते कधीही अमलात येणार नाही कारण माझा उपवास म्हणजे
रूचिपालट असतो सोबत थोडी आध्यात्मिक भावना) असो…
तर राजगिर्याचे थालीपीठ खूप आवडते पण करायला थोडा वेल लागतो त्यामुळे मी आपली पोटात काहीही धकळत असते.
तर एके दिवशी माई ला व मला एकादशी होती व तिने नवीन पदार्थ(जो मी उपवासा ला कधी खाल्ला नव्हता)बनवला.

तो म्हणजे उपवासाची मिसळ
साहित्य: १/२ वाटी शेन्गदान्याचा कूट,मिरची,जिरे,मीठ,सळई बटाटा चिप्स (finger chips)
कृती:तेलात जिरे व मिरची टाकून त्यात शेन्गदान्याचा कूट घालावा व तो थोडा तांबुस होईपर्यंत परतावा व त्यात नंतर ३ वाटी पाणी घालावे. व ते चांगले उकाडी येई पर्यंत शिजू द्यावे.
नंतर सळई चिप्स खोल प्लेट मधे घेऊन त्यावर हे शेन्गदान्या ची भाजी घालावी वरुन थोडे दही घालावे.
उपवासा ला काहीतरी वेगळे म्हणून चांगले लागते.

Advertisements
प्रतिक्रिया
 1. शब्दांकित म्हणतो आहे:

  ‘उदरभरण नोव्हे’ नसून ‘उदरभरण नोहे’ आहे.
  मागे एकदा तुमचा जुना ब्लॉग वाचला होता. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा!

 2. amitprabhale म्हणतो आहे:

  mi blogging pahilyandach karat aahe, jast kahi mahit nahi.. tumhi “Nishigand” hey devnagari font madhe kase lihile sangal ka?? Thank You!
  e mail: amit_godgod@yahoo.co.in

  • Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

   मी baraha.com नावाची साईट आहे.
   तिथे देवनागरी लिपी चे softwareमिळेल ते
   download करा.त्यात तुम्हाला देवनागरी लिपीत लिहीता येईल.

 3. sanchit म्हणतो आहे:

  Its very nice… I liked it…

 4. balasahebpuri.blogspot.com म्हणतो आहे:

  तुम्ही फार मनमोकळं लिहीता । मी नविन ब्लाँगर आहे ।तुमच्या पासुन प्रेरणा मिळते ।पाथरीला या ।हे साईबाबांच जन्मस्थान आहे ।

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s