सांगा कस जगायचं?

Posted: एप्रिल 22, 2009 in सहजच

आजच्या रात्रीत असे उद्याचा उषा काळ
खरच किती सत्य आहे वरील ओळीमधे.
का झालेला त्रास मला आजही होत असतो फक्त फरक असतो तो त्याच्या तीव्रतेचा ….
कोणत्याही दुखावर फक्त ऐकच उपचार आहे….तो म्हणजे वेळ जाणे….
विस्मरण हे मानवाला मिळालेले वरदान आहे असे वाटते.
का झालेले दुख कवटाळुन बसायचे की नवीन आशेला नव्या उमेदीने सामोरे जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे विचारपूर्वक……

म्हणूनच मंगेश पाडगावकर यांची ही कविता मला खूप आवडलेली आहे…….

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

मंगेश पाडगावकर.

यांची ही कविता मला खूप आवडलेली आहे…….
कारण माझ्यजवळ अर्धा पेला भरलेला तरी आहे पण कुनाजवळ तोही नसेल……..

Advertisements
प्रतिक्रिया
  1. varsha म्हणतो आहे:

    its true…………. time hech yavar solution ahe……………vel aapyala sagale kahi visarayala madat karate……………

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s