माझी झोप

Posted: जुलै 18, 2009 in सहजच

आज शनिवार असूनही ओफीस मधे आहे. जाम कंटाळा आलेला आहे.तसे काम पण विशेष नाही त्यामुळेच तर कंटाळा येत आहे.वेळ जाताच नाही आहे. खूप झोप येत आहे.जांभयावर जांभया येत आहे.एक जांभाई संपत नाही तोच दुसरी पहिली कुठे गेली हे बघायला तैयर आहे.आजूबाजूचे पण कलीग ओरडत आहे(की व्हैरास नको फैलवू म्हणून). पण माझा आळस काही जात नाही आहे.असे वाटत आहे की मस्त डेस्कवारच झोपावे(मला तासेही झोप येत असेल तर काहीही सुचत नाही).

झोप…माझा अतिशय आवडता प्रकार…..मला तर वाटते की मला कधीही झोप म्हटले तर झोपु शकेल इतकी
निद्रादेवि प्रसन्न आहे(अर्थात आम्ही तिची भक्ति पण तितक्याच तन्मय तेने करतो..अखंडपणे).

झोप येण्याची वर्दि कोण देते तर ती असते जांभाई..हिची अन माझी अतिशय गाढ मैत्री आहे.
अगदीच जीवभावाची मैत्रीण माझी.नेहमीच सोबत असते माझ्या.बसमधेओफिसमधे..घरीमी जिथे ती तिथे.

ओफिसमधे तर मला या वेळे दरम्यान माझी ही जीवभावाची मैत्रीण चुकता भेटत असते अगदी मिनिटाच्या फरकाने(यावरूनच कळेल माझी अन तिची किती मैत्री आहे)पण माझ्या या मैत्रिणीचा माझ्या कॅलिगला खूपच त्रास होत असतो(बिचारा रोज शिव्या घालत असतो मला कामाचे बोलायचे सोडून मला माझ्या मैत्रिनिला एकटे सोडून आपल्य जागेवर जातो(अर्थातच मला शिव्या घालत).
तर आता मला खूपच जांभया येत आहे मी हा संसर्ग आजूबाजूला पण पसरावलेला आहे.(जे जे उत्तम ते ते
वाटून घ्यावे).त्यामुळे झोपते i mean थांबते कारण PM जवळ येत आहे project details rather project progress(काय सांगू कपाळ) विचारायला.

झोप छन विषय मिळाला आहे लिहायला ……
कधीतरी नक्कीच या विषयावर लिहेन 🙂 🙂 🙂

Advertisements
प्रतिक्रिया
  1. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

    झोप…माझाही अतिशय आवडता प्रकार…:-)

  2. Rahul म्हणतो आहे:

    झोपेच्या बाबतीत तसा मीही खुप जागरुक असतो बरं का.. 😀 जसं तुम्ही ऑफीसमधे तस मी कॉलेजच्या लेक्चर मधे.. अगदी (झोपण्यासाठी) माझा शेवटचा बेंच ठरलेला असतो.. मस्त कानात ईअरफोन्स टाकुन मंद गाणी ऐकत तानुन देतो.. आणि तसही दुपारचं वातावरण म्हणजे झोपेची एकदम मस्त वेळ.. एक दोनदा सापडलोही क्लास मधे.. बट दॅट डझन्ट मॅटर.. 😀 असो.. छान लिहिलय…!! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s