काम काम काम

Posted: नोव्हेंबर 20, 2009 in सहजच
टॅगस्

आजच एका लग्न झालेल्या मैत्रिणीचा फोन आला.माझे लग्न जुळले आहे म्हटल्यावर सगळ्यात पहिले कुणीही हा प्रश्न विचारतात की फोन वर किती तास  बोलते.इतका जळफळाट होतो या प्रश्नाने की विचारू नका कारण सुरुवातीला(पहिले २०-२५ दिवस) दिवसातून २-३ तास बोलणारा माझा भावी नवरा आता दिवसातून जास्तीत जास्त ३० मी. बोलतो.कारण एकच खूप काम आहे,प्रोजेक्ट
रिलीज करायचा आहे,बग सोल्व् करायच्या आहेत …………
आणि तक्रार केली तर एकच उत्तर हे मी आपल्यासाठीच तर करत आहे.
भविष्य secure करण्यासाठी आपण आपला वर्तमान corrupt करत आहे
याचे काय?
अर्थात त्याचा पण नाइलाज असतो कारण कामाच इतके असते की मुळीच वेळ नसतो.इच्छा नसते असे नाही पण काम काम काम……………रात्री बोलायचे तर साहेब फोन वरच झोपून जातात आणि मग मी फोन बंद करते. 🙂
लग्नानंतर तर आमची आठवड्याच्या शेवटीच भेट होणार असे वाटते 🙂
कारण नंतर मी पण काम सुरू करणार आणि मी पण अशीच कामात व्यस्त होणार ….आजच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे एकमेकन वेळ पण देऊ शकत नाही आहे आपण. खरच वाटते की आपण काहीतरी गमावत आहोत या पैश्याच्या मागे लागून पण नाइलाज आहे कारण जो थांबला तो संपला अशी जगाची रीत आहे.

Advertisements
प्रतिक्रिया
 1. akhiljoshi म्हणतो आहे:

  इथे मला थोड सांगावस वाटत … आता आर्थिक दृष्ट्या किती गरज असते हा प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक कुवतीनुसार ठरत असणारा भाग आहे.. परवाच सकाळ च्या मुक्तपीठ या पुरवणीमध्ये एक लेख वाचला… कि एक दाखवायचा प्रोग्राम होता त्यात मुलीने स्पष्ट सांगितले कि मी गृहिणी म्हणून राहणार आहे.. मी त्याच्याकडे एक करीअर म्हणूनच बघते..
  माझ्या दृष्टीकोनातून,
  लग्न झाल्यावर स्त्रीत्वाचे सुखाचे क्षण, नवर्यासाठी केलेला गरम गरम चहा, तो ऑफिसमधून आला कि त्याला किचन मधून येणार स्वयंपाकाचा सुवास, (एकमेकांसाठी अपेक्षेनुरूप वागणे) त्याने त्याच्या चेहऱ्यावर दिसारणारे सुख, एकूणच पुढे निर्माण होणारी पिढी, त्यांची जोपासना, त्यांच्यावर करायचे संस्कार, आई -वडिलांची सेवा, आनंदाचे कित्येक क्षण तयार करता येण्यासारखे असतात, दोघांनी नोकरी करून निर्माण होणारा तणाव, एकमेकांसाठी अनुपलब्धता , त्यातून निर्माण होणारी क्लिष्ट नाती, त्यापेक्षा तिचे गृहिणी होण्याचे मत मांडणे मला बरोबर वाटते.
  खाण्यासाठी जगण असाव का जगण्यासाठी खाणं? आपण उगाच जास्ती पैसा निर्माण करायला जातो आणि त्यात आपली मानसिक आणि शारीरिक दमछाक होते,
  कारण प्रत्येकालाच भरमसाठ पैसा कमावणे शक्य नसते, हफ्त्याच आयुष्य आपण बनवतोय……. अर्धी सुखाची भाकरी खायची सोडून….. काय हवे आणि काय नको यात आपण गल्लत करतोय असा नाही का वाटत?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s