माझा मॉर्निंग वॉक

फेब्रुवारी मधे लग्न असल्यामुळे तोपर्यंत थोडे वजन कमी करावे असा उदात्त विचार 🙂 केला व आजपासून सकाळी मॉर्निंग वॉक ला जाण्याचे सुरू केले. तसे मॉर्निंग वॉक ला जाण्याचे खूप दिवसापासून ठरविले होते पण कोणतीही योजना अमलात यायला वेळ हा लागणारच 🙂 .तर आजपासून मॉर्निंग वॉक नामक युद्धावर आमची स्वारी निघाली.कोणत्याही मोहिमेला जायचे म्हणजे पूर्वतयारी ही आलीच  तसे आम्हाला ६ महिण्यापूर्वीचा अ  नुभव  गाठीशी होताच पण पराभवाला कोणतेही कारण मिळू नये म्हणून रात्रीच १ ट्रॅक पॅंट विकत आणून मोहिमेचा श्रीगणेशा केला.
सहजासहजी फत्ते होईल ती मोहिम कसली याचा प्रत्यय सकाळीच आला कारण ५.४५ चा गजर बंद करून पुन्हा झोपेच्या स्वाधीन कसे झाले हे कळलेच नाही अन अचानक उचकी लागावी असा जाग आला बघते तर काय ६.१५ झलेले. बापरे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी माशी शिंकाली ,विचार केला नाहीतरी उशीर झालेलाच आहे तर उद्याच जावे 🙂 व आता थोडी झोप घ्यावी मग नंतर विचार आला की
शुभस्य शीघ्रम .शेवटी ब्लन्केट नामक कवच कुंडाले झुगारून दिले व ६.३० ला मॉर्निंग वॉक
ला बाहेर पडले . पार्क पर्यंत जाई पर्यंत ६.४० झाले . न जाणे का पण रस्त्यावरून जाताना सगळे माझ्याच कडे बघत आहे असे वाटले (प्रत्येक जन जणू नजरेने म्हणत होते की बघू किती दिवस नियमीत येते ते 🙂 ).
पार्क मधे पहिलाच राऔंड घेत होती तर १ अलसेशियन कुत्र जवळ सुप्र भात म्हणायला आले. मी जागच्या जागीच गोठून गेले पण मग त्या कुत्र्याच्या मालकाने त्याला आवाज दिला विचार केला होता की आजचा बहुदा मॉर्निंग वॉक चा पहिला व शेवटचा दिवस राहणार(जर ते कुत्रे चावले असते तर) पण बहुदा आज नशीबची साथ होती.
असो तर आजचा मॉर्निंग वॉक एकंदरीत निरवीघ्न 🙂 पार पडला.

गाठीशी

4 thoughts on “माझा मॉर्निंग वॉक”

 1. असंच होत
  मोर्निंग walk किवा तत्सम कुठलाही नवीन निग्रह केला
  कि तो आचरणात येईपर्यंत काही खर नसत.
  मी हि कित्येक दिवस खेळायला जायचे म्हणतोय पण आज नक्की जाईन असा ठरवलं आहे
  वजन कमी तर मी करायचा ठरवलं आहे थोडस
  फिट आहे तसा मी
  तरी जरासा बारीक व्हायचं मला
  पण निग्रह केला कि त्याची सुरुवात कारण आणि ते चालू ठेवण हे कठीण काम आहे
  खूप वेळा व्यायाम शाळेत जायचा मी प्रयत्न केला आहे
  पर्यंत खूप झाले पण ते एक दोन तीन महिन्याच्या वर काही जमले नाही
  कुठेतरी माशी शिंकतेच … असो
  ….कुठल्या चांगल्या कामाचा विचार मनात येणे हि काही वाईट गोष्ट नाही

 2. सकाळी निघतांना आयपॉड घेउन जात जा.. चांगला वेळ जातो. आणि जी गाणि घरी बायको घरी ऐकु देत नाहित ती.. ( माझ्या बाबतित क्लासिकल ) ती ऐकायला तर खुप मजा येते. वजन कमी होत नाही.. पण मजा मात्र नक्की येते.. शुभेच्छा..

 3. हो आता उद्यापासून अगदी जय्यत तयारिनीशी जायचे ठरवले आहे.
  बापरे..वजन कमी नाही होत…भावी नवरा जीव घेईल माझा…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s