केळ्वण

Posted: डिसेंबर 3, 2009 in सहजच
टॅगस्,

kelwan फेब्रुअरी मधे लग्न असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे हळुहळू केळ्वणा ला बोलावणे यायला लागले आहे. नोकरी सोडल्यामुळे तशी मी घरीच आहे  🙂  पण बोलावणारे पण घरी असायला हवे ना.तर मुंबईतला माझा stay आता काहीच दिवस असल्यामुळे रविवारी ठाण्यला आते बहीण राहते तिच्या घरी केळ्वणा ला बोलावणे आहे.मजा वाटत होती सोबत excitement पण होती.

लग्न होणार म्हणून आता मी काहीतरी विशेष व्यक्ती आहे असे मला भासत आहे निदान नातेवाईक तरी तसे भासवत होते.उदा. काहीही चुकले तर ओरडाणारे नातेवाईक जाउ दे आता किती दिवस अशी वागणार आहे ती वगेरे वगेरे म्हणत होते.त्यामुळे घरात सद्ध्या सन्माननीय व्यक्ती 🙂 झालेली आहे.मजा वाटत आहे.कारण अजूनही जबाबदारी ची जाणीव झालेली नसल्यामुळे मुक्तपणे आयुष्य उपभोगणे सुरू आहे(वास्तवाचे चटके बसतच नाही आहे आई बाबांच्या मायेच्या सावलीमुळे) असो….तर आता आमचे केळ्वण हाद डने सुरू आहे सोबत morning walk पण सुरू आहे,balance नको का करायला…..कधी कधी विचार येतो की अमरावतीला घरी गेल्यावर तर रोजच केळ्वण  राहतील आणि आमचे खाणे तर uncontrolled आहे.जर असे झाले तर लग्न होईपर्यंत वजन नक्कीच दुप्पट होणार आणि भावी
नवरा भरपूर शिव्या घालणार.जाउ देत पुढचे पुढे”भविष्याचा विचार करून वर्तमान कशाला खराब करायचे
सद्ध्या तरी मज्जा नि life 🙂 🙂 🙂

Advertisements
प्रतिक्रिया
 1. महेंद्र म्हणतो आहे:

  अरे वा; तुम्ही तर आपल्या गाववाल्या निघालात .. काही होत नाही हो, बिनधास्त चालु दे केळवण. कशाला उगिच जास्त काळजी करता..

  अमरावतीला रघुविरची कचोरी शाम टॉकिज जवळची अजिबात टाळउ नका बरं, काही होत नाही वजनाला. थोडं जास्त फिरायचं बस्स……

  • asmita pawar म्हणतो आहे:

   मला माहितीच नव्हते की रघुवीरची काचोरी प्रसिद्ध आहे ते.
   आता अमरावतीला गेल्यावर नक्कीच खाउन बघणार.

   मनातले सांगायचे तर तुमचा अभिप्राय बघितला ना की आभाळ थेगने वाटते.
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद

 2. तो म्हणतो आहे:

  लहानपणी घरी कोणाला केलवनाला बोलावले कि मला वाटायचे त्यांना केळाचे शिकरण द्यायचे आहे 🙂
  आणि वजनाची चिंता नको करू, बिन्दास्त खा.

  to99.wordpress.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s