अडवणूक

Posted: मार्च 30, 2010 in सहजच

काळ संध्याकाळी ओफीस मधून मोर(कोथरूड)मधे गेली खरेदीसाठी.
खरेदीमुळे दोन्ही हातात एक याप्रमाणे दोन पिशव्या होत्या व खांद्याला पर्स होती.
हात दुखायला लागले होते.जवल्च एक रिक्षा थांबा होता.
हातातल्या पिशव्या सांभाळत रिक्षा जवळ पोहोचले व विचारले की महाराजा कॉंप्लेक्स समोर
तर कुणीही यायला तयार नहि.खरेतर तिथे नंबर प्रमाणे रिक्षा होती पण पहिले ३-४ रिक्षा यायलाच तयार नाही.
आता काय करावे हेच सुचेन.रत्रिचे जवळपास ८.१५ वाजले होते व घरी कधी व कसे जायचे हाच प्रश्न होता.
तेव्हा एक रिक्षावला ज्याचा जवळपास ७-८ नंबर होता तो म्हणाला . मी सोडतो चला…
जिवात जीव आला माझ्या…….
मग विचार केला की…हेच रिक्षावले ओरडतात की सवरी मिळता नाही आणि जवळपास जायचे असेल तर हेच जायला
तयार होत नहि.साधा माणुसकीचा पण विचार करत नाही की रात्र झालेली आहे व एकटी मुलगी…त्यात हाती दोन पिशव्या आहेत….आणि तरी ते जायला तयार नाही कारण जवळच जायचे आहे.भाडे जास्तीत जास्त २० रुपये होतील.
खूपच संताप आलेला होता पण मी करणार तरी काय……
मग एकदम आठवले की कोथरूड पोलिस स्टेशन च्या खाली एक बोर्ड लिहिला आहे की कोणताही रिक्षावाला जर अडवणूक
करत असेल तर दिलेल्या नंबरवर फोन करा व त्या रिक्षावल्याचा गाडीचा नंबर द्या……
एकंदर काय तर त्याची तक्रार करा……
माज्यासोबत पुन्हा असे झाले तर मी नक्कीच तक्रार करणार…..

Advertisements
प्रतिक्रिया
 1. शिरीष म्हणतो आहे:

  तक्रार नक्की करू नका… तेही (बहुतेक वेळा) तुमच्या सारखेच दिवसाची भाडी करून थकलेले असतात आणि शेवटचे घराच्या दिशेने जाणारे भाडे शोधत असतात. तक्रार जरूर तेव्हाच करावी जेव्हा तुमची खात्री आहे की ७ वा किंवा ८ वा रिक्षावाला (ज्याने तुम्हांला नेऊन सोडले) कधीच उगवणार नाहीये… आणि तुमच्यापाशी त्या पोलिसांशी गप्पा मारायला खूप वेळ आहे… 🙂

 2. Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

  🙂
  दमलेलि असतात मला मान्य आहे पण
  तेच जर मी दुर जायचे आहे सांगितले असते तर
  एका पायावर तयार झाले असते सगळे……

  • शिरीष म्हणतो आहे:

   ह्यात असे काय ते वेगळे त्यांनी केले किंवा आपण केले की जे इतर करणार नाहित असा विचार करून पहा…
   आपल्याला सुद्धा आवडीचे काम मिळाले की आपण ते उड्या मारत करतो आणि नावडीचे ते शक्यतो नाकारतो… जोवर आपण तसे वागतो तोवर आपल्याला इतरांच्यावर चिडायचा अधिकारच प्राप्त होत नाही…

 3. Vikram म्हणतो आहे:

  To shirish,

  In that case, I will say they should be going home straight instead of waiting at the stand.

  One more place, where I experience more is Near Kinara hotel, poud Road. I stay in that area and work near SNDT bridge, Karve Road. Almost every morning I have experience same in the morning around 10, they are not ready to come. Pune station sanga, lagech yetil.

  Hya saglya ani ashach anubhavannna waitgun I bought my own vehicle at the earliest opportunity.

  So ugich ghyachi mhanun konachi baju ghevu naka.

  To Asmita, if possible to number pan dya blog var.. naitar mi police station var jaun shodh gheinch.

  Regards,
  Vikram

 4. Vikram म्हणतो आहे:

  Dhanyawad!

  he riksha wale jevha nahi mhantat tevha nit wagat pan nahit – they just say no and turn their faces as if jevha ho mhanat tevha upkar karat astat.

  I think Shirish hyanni kadahit to anubhav ghetla nahiye.

  • शिरीष म्हणतो आहे:

   हा विषय खूप छान आहे गप्पा मारायला… म्हणून सांगतो… नेहमी तोच प्रवासी सुखी असतो जो सुटसुटीत प्रवास करतो…! जे आपल्या आवाक्याबाहेरचे सामान वाहतात ते दुःखी होणारच… 🙂

  • शिरीष म्हणतो आहे:

   अमेरिकेतिल वास्तव्या दरम्यान २ मैल लांबच्या ग्रोसरी स्टोअर मधून ३-३ पिशव्या सामान आणताना कोणितरी प्रेमाने देऊ केलेली लिफ्ट देखिल नाकारणारे आणि २-३ मैल चालत सामान वहाणारे आम्ही…

   तेव्हा आणखी काही शाब्दिक ओझी आम्ही वहावी असे वाटत असल्यास सांगा…

   औषध कडू असले तरी गुणकारी असेच असावे…!

 5. Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

  सुटसुटीत प्रवास म्हणजे काय?
  आवाक्याबाहेरचे सामान चा अर्थ नाही कळला?
  तुम्हाला असे तर म्हणायचे नाही आहे ना की जास्त समान असेल तर रिक्षा ने प्रवास नका करू.
  अहो, जर स्वताचे वाहन असते तर रिक्षा वल्याच्या फन्द्यात नसते पडले.

  • शिरीष म्हणतो आहे:

   शक्यतो अशा गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळायच्या की जेणेकरून आपण कोणी तिऱ्हाईताच्या कीवेवर अवलंबून असतो… ते कसे ते आपण हळू हळू शिकून अंमलात आणू शकता…

 6. Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

  सगळ्यात महत्वाचे म्हणजे रिक्षाने प्रवास हे फक़त उदाहरण झाले
  मूळ मुद्दा हा माणुसकीचा आहे.स्वताच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहावयाचा आहे.
  “आपल्या हातात सत्ता आहे म्हणून दुसर्‍याचे मुडदे पाडू नये

 7. Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

  हो अगदी बरोबर आहे……
  पण मी दुसर्‍याची अडवणूक होईल,दुसर्याला काही त्रास होईल असे जाणीवपूर्वक मुळीच करत नाही.
  आणि हो ते रिक्षावाले तुमचे नातेवाईक होते का?
  परिस्थिती माहिती नसताना उगाचच आती परखड मत मांडू नये शहाण्या माणसाने…..

 8. शिरीष म्हणतो आहे:

  माफ करा पण मी यापुढे आपल्या ब्लॉगवर मते मांडणार नाही… कारण आपण जाणता..!

 9. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

  पुन्हा त्रास झाला तर तक्रार नक्की करा. आणि बर झालं ते पोलिसांचा विषय काढलात. मला अनेकदा ह्या प्रसंगांना तोंड द्याव लागल होत. मुंबईला माझा पहिला दिवस असाचं होता. असो, मीही ह्यापुढे लक्षात ठेवील. नाही तरी पुण्यातील रिक्षावाले खुपंच जास्त माजलेले आहे.

 10. SHARAD म्हणतो आहे:

  shirish tumhi chukichya muddyawar wad ghalata ahat. anubhaw ala ki kalelch tumhala.

  • शिरीष म्हणतो आहे:

   ज्याने दिल्लीत रिक्षाने प्रवास केलाय कधिकाळी तयाला पुण्याचे रिक्षावाले म्हणजे आरामगाडीच…:-)

 11. sharad म्हणतो आहे:

  shirish,

  mag mumbait tar tumhala ac car watel. ani delhichya buses barobar mumbaichi bus compare kelit tar volvo bus vatel bestchi.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s