पाऊस…

Posted: जून 10, 2010 in पाऊस
Tags: ,

का माहिती पण मला पऊस खुपच आवडतो.
पावसात भिजने, गरम गरम पदार्थ खाने नन्तर गरम गरम दुलईत पडुन राहणे आवडती गाणी मन्द मन्द आवाजात ऐकत…
अर्थात असा आनन्द मला नेहमीच मिळतो असे नाही पण मला स्वप्न बघायला कुठे पैसे मोजावे लागतात….
अशीच पावसाची मला आवडलेली कवीता……

पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.

कवी – सौमित्र

Advertisements
प्रतिक्रिया
 1. priti says:

  खूपच छान कविता, खूप आवडली..

 2. हेमंत आठल्ये says:

  ही कविता आहे हे मला माहिती नव्हते. ‘गारवा’ मधील हेच एक गाणे मी नेहमी ऐकतो. मस्त आहे. खुपंच छान.

 3. हो ति कवीता आहे सौमित्र ची…
  सौमित्र हे टोपन नाव आहे.मुळ नाव किशोर कदम आणी ते खुप चान्गले नट आहेत.

 4. Swapnil says:

  पावसाची ही कविता मला खुप आवडली !!!

 5. vinita says:

  mahit nahi pan , hi kavita mala far avdte. ani saumitra yanche likhan suddha.

 6. shaile says:

  mala pan he gane phar phar avadhtey,
  garva

 7. vinay thakur says:

  khupch chan vachanya pesha ikala sundre aahe tyat Soumitra (kishor kadam )cha dhirgambhir aavaj

 8. Sanjivani says:

  सौमित्र यांची कविता मग काय बोलायलाच नको.
  त्यांचं कवितावाचन ऐकलं की ती नशा उतरायलाच काही काळ जावा लागतो. एक उत्तम कलाकार ते आहेतच पण एक आर्त आवाजाची देणगी त्यांना लाभली आहे.

 9. सुकलेल्या गळ्यात … एक सरीचा हार दे

  तुझ्या आभाळामधून, एक ढगउधारदे

  ओळखीच्या ह्या अश्रूत , माझे तू प्रतिबिंब घे

  दिसणार नाहीत असे , क्षण ओलीचिंब दे

  माझ्या ह्र्यद्यात दुष्काळ , शहारणारा आधार दे

  तुझ्या आभाळामधून, फक्त एक ढगउधारदे

 10. Realy Khup Chan Aahe Kavita, Vachtach Mala Maza lahan Panicha Aathvanit Ghevun Geli……..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s