सिह्गड Trekking

Posted: जून 15, 2010 in सहजच

शनिवारी रात्री ११ वाजता ओफीस च्या सहकारी चा फोन आला की उद्या १२ तारखेला रविवारी सिह्गड ला जायचे का?हा काही प्रश्न आहे का 🙂 आम्ही दोघानीही हो म्हटले.सकाळी ५ वाजता निघायचे होते……
सकाली ६ वाजता उठलो व दोघेही ६.४५ पर्यन्त तयारी करुन बसलो पण कुणाचीही तयारी झालेली नव्हती.शेवटी ७.३० वाजता घरुन सगळॆ निघालो….मी, राम, हरीष, मीनल, पल्लवी व प्रवीण सोबत ३ गाड्यान्वर आम्ही सिह्गड ला जान्यासाठी निघालो.
९ वाजता आम्ही सिह्गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.तिथे गाड्या लावल्या.तिथे एका ठिकाणी नाश्ता केला व सिहगड चढायला निघालो.खालुन गडाची उन्ची बघुनच मला घाबरायला लागले…बापरे इतके उन्च कसे चढनार आपण….आणी मग हळु हळु आमचे गड चढने सुरु झाले.९.३० वाजता आम्ही चढायला सुरुवात केली.

माझ्या बाबतीत म्हनायचे तर माझी mental strength कमी पडते physical strength पेक्शा अर्थात मी काही खुप चपळ वगेरे नाही तरीपण चढु शकते फक्त उन्चावरुन खाली बघितले तर चक्कर यायला लागतात.:)
काही अन्तर गेल्यावर एका ठिकाणी थाम्बलो.अर्थात जर गड चडायचा असेल तर विशिष्ट अन्तरानन्तर थोडासा आराम करने अत्यावश्यक होते.तसेही आम्हाला मुळीच घाई नव्हती त्यामुळे आम्ही चढाईचा आनन्द घेतच थाम्बत थाम्बत चढुन राहीलो होतो.
लिम्बु सरबत पिन्यासाठी आम्ही ३ ठिकाणी थाम्बलो.
शेवटी शेवटी तर मी खुपच थकले होते व असे वाटत होते की आता पुढे चढने शक्यच नाही पण हरीश ने मला हात पकडुन नेले.आमच्या जवळ पाणी नव्हते तर चढनार्या लोकाना पाणी मागितले.
शेवटी १.१५ वाजता आम्ही गडावर पोहोचलो.
सिहगडावरचे कान्दा भजे प्रसिद्ध आहे असे राम मला नेहमीच सान्गत होते .तसेही सगळे थकलेले होते त्यामुळे पहिले काहीतरी खायचे असे ठरले.आणी मग चान्गले कान्दा भजे चे दुकान शोधने सुरु झाले.कुणी म्हनत होते कि कुणी म्हनत होते कि आपण मागे आलो त्यावेळेस तिथे गेलो होतो असे करत करत आम्ही एका दुकानात गेलो.तिथुनच खाली बघितले तर दरी दिसत होति.
तिथले प्रसिद्ध कान्दा भजे सोबत दही व नन्तर पिठले भाकरी खाल्ले.भजी चान्गले होते.लहान लहान काळ्या मडक्यातील लावलेले दही छान दिसत होते. दह्यासोबत खान्यासठी साखर, मिठ व जीरे पावडर दिलेले होते.सगळेजण भजी सोबत दह्यावर ताव मारत होते.
असे म्हनतात की सगळ्यात चान्गला टाईमपास असेल तर तो म्हनजे जिवन्त माणसे बघन्याचा, प्रत्येकाची आपली वेगळी तर्हा त्यातही काहीतरी खानारी माणसे बघने म्हनजे दुग्धशर्करा योग..प्रत्येकाची खान्याची आप आपली वेगळी पदधत, वेगळी स्टाईल…..

पोटोबा झाल्यानन्तर किल्ला बघन्यासाठी गेलो पण किल्ल्यात बघन्यासारखे विशेष काहिही नाही, नरवीर तानाजी मालुसरे ची समाधी शिवाय.

गडावर फिरुन झाल्यावर आम्ही ५.३० वाजता निघालो.सगळ्यान्ची इच्छा होती की गड उत्रुनच जावे पण खुप उशीर झाला असता घरी पोहोचायला म्हनुण आम्ही गडावरुन जीपने पायथ्याशी आलो व तिथुन आमच्या गाड्यानी परतीच्या प्रवासाला निघालो.वाटेतच खडकवासला धरण होते तिथेपण पाण्यात भरपुर डुम्बलो……
एकन्दरीत खुपच मजा आली………
न विसरता येन्यासारखा एक दिवस होता तो…..
Advertisements
प्रतिक्रिया
  1. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

    छान! मी सुद्धा मध्यंतरी कोकणात जावून आलो. मस्त आहे. डोंगर, दर्या, धबधबे, पाऊस. एक नंबर..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s