माझा जिवश्च मित्र

Posted: ऑगस्ट 17, 2010 in सहजच
Tags: , , , ,
सद्ध्या माझा एक जिवश्च मित्र आहे.
रोजतर तो माझी सोबत सोडत नाहीच पण आठ्वड्याच्या शेवटी तर हाकलुन लावले तरी दारात येनार्या कुत्र्यासरखे पुन्हा पुन्हा माझ्या सोबत येतो.
तो मला सोडत नाही की मी त्याला हा मात्र गहन प्रश्न आहे आणी यावर विचार करायचा मला कंटाळा येत आहे :).
या मित्राचा प्रथम प्रत्यय मला ४ आठ्वड्यापुर्वी माहेरी गेले त्यावेळेस आला.
जो भेटेल तो, लग्न मानवले असे म्हनते होते सोबत नवरोबा तर कितीतरी दिवसापासुन म्हणत होते पण मी त्याला मात्र उडवुन लावत होते व त्याच्या वाढणार्या पोटाकडे बोट दाखवुन विशयांतर करत असे 🙂 असो..
३ आठ्वड्यापुर्वीं मुंबई ला गेली होती.तिथेपण तसेच…
सारांश दिवसेंदिवस त्या मित्राच्या आधिन होत आहे मी त्यामुळॆ कंबरेचा घेर वाढ्त आहे.
तोच तो..
बरोबर ऒळ्खलत….
आळस माझा जिवश्च मित्र…
पहीले कार्यालयाला फ़क्त रविवारीच सुट्टी असायची पण मागच्या आठ्वड्यापासुन शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी आहे तरी पण
एका रविवारच्या सुट्टीत जितके काम व्हायचे घरचे व बाहेरचे तितकेच होते.
काय म्हनायचे याला.
शनिवार सुट्टी नव्हती तेव्हा मी नेहमी म्हनायचे की ग्रंथालयात जायला वेळच मिळत नाही पण
२ दिवस सुट्टी असुन देखील ग्रंथालयाच्या रोडकडे पण फिरकली नाही मी…
दिवसेंदिवस आळस वाढत चालला आहे.
पुण्यात आल्यापासुन जरा जास्तच आळशी झाले आहे मी (कदाचित पुण्याच्या वातावरणातच तो गुण असेल :))
मुंबईला असताना रोज ६ वाजता उठनारी मी पुण्यात आल्यापासुन ६ कधी वाजतात हे बघायला पण नाही उठत 🙂
फ़क्त काही पुजा करायची असेल उदा. नागपंचमी, श्रावण सोमवार, मंगळागौर तर मात्र नेहमीपेक्शा थोडी लवकर उठते.
सारांश हा की मी प्रचंड जाडी झालेली आहे व आता काहीतरी करने क्रमप्राप्त आहे.
उद्या नक्की सकाळी उठुन फिरायला जाते (कुणीतरी उगाचच नाही म्हटले, उद्या तुझ्यामुळे आजचा अशांत मी)
Advertisements
प्रतिक्रिया
 1. 🙂 जगाचा खरा उद्धार आळश्यांच्याच हातून झालेला आहे. 🙂

  आणि यात तुमचा काही दोष नाही….पुण्याचा तो गुणधर्मच आहे. तिथे सगळे निवांत असतात. आणि मुंबईत सगळे सदैव घाईत असतात.

  दोन्हीकडे सगळे अतीच आहे त्याला आपण तरी काय करणार?

 2. कदाचित पुण्याच्या वातावरणातच तो गुण असेल…:P
  हे मात्र खरे…मुंबई इज बेष्ट

 3. pratal says:

  या मित्राला शत्रू बनवण्याचा मलाही एखादा उपाय सांगा !खूप गरज आहे त्याची !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s