माझी पहिली मंगळागौर

काल माझी पहिली मंगळागौर होती, त्यामुळे रविवार पासुनच उत्साह अगदी ओसंडुन वाहत होता.
त्याला नवर्याची पण सोबत होती (बाजारात जाउन सामान वगेरे आनायला)
रविवारी न आनलेले सामान आनायला पुन्हा सोमवारी बाजारात गेलो. खरेतर नवर्याला बरे नव्हते वाटत.
पण आला हो नवरा सोबत( असे झाले ना की नवर्याचे आपल्यावर खुपच प्रेम याचा पुन:प्रत्यय येतो)
मंगळ्वारी सकाळी लवकर उठुन 🙂 (लवकर म्हनजे नेहमीपेक्शा ३०मि.आधी उठले, त्याचाच किती आनंद 🙂
सगळे आवरुन पुजा आटोपली.आणी हो महत्वाचे म्हणजे उपवासपण केला तो पण कडक (नवरोबा बघा तुमच्यासाठी आम्ही किती खस्ता खातो ते).
मंगळागौरची कथा वाचली.माझा त्या कथेवर विश्वास असन्यापेक्शा सगळ्या करतात म्हणुनच मी ती वाचली.
पण पुजा मात्र खुप श्रद्धेने केली शेवटी नवर्याच्या दिर्घायुश्याचा प्रश्न आहे.यावर मात्र माझा विश्वास आहे की आपण श्रद्धेने केले ना तर त्याचा फायदा होनारच.असो…..
रात्री मात्र खुपच भुक लागली होती. कसेतरीच वाटत होते, शेवटी नवरोबाच्या परवानगीने (मुद्दामच विचारले, नवरा चुकुनही नाही म्हणनार नाही याची खात्री होती म्हणुन 🙂 ) रात्री फ़राळ केला.
शेवटी त्या मंगळागौर जवळ मागितले की “आयुश्यात कितीही संकटे आली तरिही आम्हा उभयतांचा एकमेकांवरचा विश्वास मुळीच कमी होउ नये.”

9 thoughts on “माझी पहिली मंगळागौर”

 1. छान आहे, अस्मिता. मला पण पहिल्या मंगळागौरीला जाम मजा आली होती…. न बोलता 16 पुर्णाचे दिवे (मोदक) खाणे म्हणजे मला आताही आठवूनच धाप लागते….. 🙂

  1. नाही ग प्रिती आमच्याकडे १६ दिवे केले होते पण ते पुरणाचे नव्हते.
   पुरणाचे दिवे खायला काय मजा येत असेल, नाही(मला पुरण खुप आवडते)
   इथे पुन्यात मोठे कुणीच नाही त्यामुळे फोनवर जसे सांगितले तसे मी केले.
   एकटी असल्यामुळे आईनेपण जास्त बारीक काही करायला नाही सांगितले.
   तरीपण मला खुप छान वाटले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s