पुणे महाबळेश्वर पुणे

Posted: जानेवारी 10, 2011 in सहजच
टॅगस्

रोज रोजच्या दिनक्रमामधुन एक दिवस सुट्टी घेन्याचे आम्हा सगळ्याना वाटत होते त्यामुळे शनिवारी ८/०१/२०११ तारखेला माथेरानला जाण्याचे ठरवले पण शनिवारी ओफिसमधे इंटर्व्हीव असल्या मुळे जाणे रद्द झाले.पण काहिही झाले तरी एक दिवसासाठी कुठेतरी बाहेर जायचेच असा आम्ही ४ जणांनी (मी, राम, पल्लवी, प्रविण) चंग बांधला होता.शेवटी शनिवारी संध्याकाळी ठरले  की रविवारी माथेरानला जायचे व इंडीका पण बुक केली पण इंडीकावाल्याने सांगितली की इंडीका माथेरानला वर जानार नाही त्यामुळे रात्री ठरवले की पाचगणीला जायचे.रविवारी सकाळी ७ वाजता सगळ्यांनी तयार राहायचे असे ठरले. राम कधि नव्हे ते रविवारी सकाळी ५.४५ ला उठले ते पण अलार्म आधी व मला पण उठवले.मी सकाळीच ७ वाजता किराणा दुकानात गेले व चिप्स, चिवडा वगैरे स्नेक्स घेतले 🙂 (बघा पिकनिक साठी काहिही करायला तैयार, नाहीतर रविवारी घरातुन खाली उतरायला तैयार नसते मी) असो..
सकाळी आमची गाडी ७.१५ला पाचगणीला जायला निघाली. ९.४५ पर्यन्त पाचगणीला पोहोचलोपण आणी तिथे ठरवले की महाबळेश्वरला जायचे जे तिथुन फ़क्त २०किमी दुर होते. आम्ही काय आमच्या मर्जीचे राजे होतो. निघालो महाबळॆश्वरला जायला.
रस्त्याने जाता जाता एक आजोबा रस्त्याच्या कडेला स्टोबेरी घेउन बसलेला होता. स्टोबेरी दिसल्याबरोबर तिथेच गाडी थांबली व उतरलो आजोबांवर क्रुपा करायला 🙂 १४०रु किलो होती स्टोबेरी. आम्ही अर्धा किलो घेतली व तिथेच तोंडात टाकुन पाहिली तर अहाहा पहिल्याच बाईट ने दात,जिभ त्रुप्त झाले. ईतकी सुंदर स्टोबेरी यापुर्वी कधिही खाल्लेली नव्ह्ती. शेतातली ताजी ताजी स्टोबेरी डोळे, मन, पोट त्रुप्त करत होते. त्याच आजोबा जवळुन मी ताजी फुल कोबी व पान कोबी घेतली. त्या सुंदर मांडलेल्या स्टोबेरी  बघुन तर मन भरतच नव्हते असे वाटत होते की तिथुन जावुच नये. रस्त्याच्या थोडे खाली उतरले स्टोबेरी ची झाडे बघन्यासाठी. छोट्या छोट्या लाल चुटुक स्टोबेरी ने लगडलेली हिरवी हिरवी झाडे मन मोहुन घेत होती. डोळ्याने ते हिरवे सौंदर्य किती पिउ अन किती नाही असे होत होते.
चार लोकांमीळुन १किलो स्टोबेरी आम्ही फ़स्त केली 🙂 सोबत चिप्स, बिस्किट्स होतेच.
१० वाजता आम्ही वेण्णा लेक जवळ पोहोचलो. तिथे होर्स रायडिंग होते. माझी खुप दिवसाअपासुनची होर्स रायडिंग करायचे होते इच्छा होती.राम ने एका घोड्यावाल्याशी बोलने केले.होर्स रायडिंग फ़क्त मलाच करायचे होते. होर्स रायडिंग करायचे तर होते पण जशी घोड्यावर बसायची वेळ आली तशी माझी हालत खराब झाली. घोड्यावर बसल्यावर घोडा जसजसा हलत होता तसतशी मी ओरडत होते. मी त्या घोडेवाल्याला मला घोड्यावरुन उतरु दे म्हनत होते पण मधे उतरता येत नव्हते. मी खुप ओरडत होते. राम पुर्ण वेळ माझ्या घोड्यासोबत चालत होते व मला पकडुन होते. मला हिम्मत देत होते. घोड्यावरुन उतरल्यावर माझ्या जिवात जीव आला. प्रविण, पल्लवी खुप हसत होते मला. बापरे!!!खुप भिती वाटते होर्स रायडिंग करतांना.
नंतर आम्ही बोटींग केले. खुप मजा आली एक तास बोटींग करताना.नंतर आम्ही कोर्न खाल्ले व दुसरे पोईंट बघन्यासाठी निघालो. महाबळेश्वर एसटी डेपो जवळ काय बघायचे हे ठरवले. तिथे मी, पल्लवी व राम आम्ही एका कपड्याच्या दुकानात गेलो. कुर्ता, शोल, टोपी बघितली पण तो दुकानदार खुपच उद्धट होता. शेवटी काहिही न घेता त्या दुकानातुन बाहेर पडलो.नंतर शिव मंदिर बघन्यासाठी गेलो. तिथेच पंचगंगा(क्रुश्ना, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री) मंदिर आहे ते पण बघितले. दुपारचे २ वाजले होते व पोटातील कावळे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होते म्हणुन तिथेच मंदिराच्या बाहेर एक होटेल आहे तिथे पोट्पुजा केली. साधेच जेवण होते पण रुचकर होते त्यामुळे मन व पोट दोन्ही भरले.नंतर आम्ही अर्थुर सीट पोईंट, विन्डो पोईंट, केसल पोईंट, सावित्री पोईंट, मार्जोरी पोईंट बघितला. पहाडावरुन खालिल दरी वेगवेगळ्या जागेवरुन बघितली (त्या प्रत्येक जागेला वेगवेगळे नाव आणी सोबत वेगळीवेगळी कहानी 🙂 ) तिथुनच आम्ही दुर्बिणितुन प्रतापगडावरीम शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला.
एव्हाना ५ वाजलेले होते व आम्हाला सुर्यास्त पाचगणीला बघायचा होता. जाताना रस्त्यात गो कार्टिंग दिसले होते त्यामुळे ते करायचेच असे रामला म्हटले. महाबळेश्वर सोदुन १०-१५ मिनिटे झाली होती तरी गो कार्टिंग काही दिसत नव्हते. थोड्याच वेळात आमची गाडी “गार्डन आईस्क्रिम रेस्टौरंट आनी गो कार्टिंग” समोर थांबली आणी आम्ही गो कार्टिंग चा आनंद लुटला.
पाचगणीला जाता जाता एक खुप छान रेस्टोरंट दिसले. तिथे बसुन खलची दरी व दुरवरची नदी, पहाड असा खुप सुंदर नजारा दिसत होता. ति निसर्गाची उधळन डोळ्यांम्धे साठ्वुन एकंदरीत न विसरन्यासारखा अनुभव घेउन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

This slideshow requires JavaScript.

Advertisements
प्रतिक्रिया
 1. Nagesh Deshpande म्हणतो आहे:

  खूप छान…

  फोटो ही खूप छान आले आहेत.

  नागेश देशपांडे

 2. vaibhav sadakal म्हणतो आहे:

  प्रवासाची माहीती छान आहे.आमचा हि बेत आहे महाबळेश्वरला जाण्याचा पण इतक्यात शक्य नाही.

 3. सचिन पाटील म्हणतो आहे:

  महाबळेश्वरचे फेमस असे स्ट्रोबेरी विथ क्रीम या आइसक्रीमची चव चाखली की नाही…?

 4. bhaanasa म्हणतो आहे:

  सहीच! वर्णनाने व फोटो पाहून आमच्या अनेक महाबळेश्वराच्या वार्‍या आणि गमती जमती आठवल्या.

  • Asmita Pawar Mendhe म्हणतो आहे:

   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
   एका दिवसात जितकी शक्य होती तितकी मजा केली आम्ही.
   अजुन पुन्हा जायची ईच्छा आहे उरलेली मजा करायला.

 5. rajesh tambe म्हणतो आहे:

  i like mahabaleshwar

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s