देहू आळंदी

काल  देहू आळंदी  गेले होते
आई, बाबा, सपना(भावाची नवपरिणीत वधु ), नीरज (मामेभाऊ) व माझे पिल्लू .
अगदी अचानक ठरले . आई म्हणाली एकादशी आहे आळंदीला जाऊ अन kab बुक केली अन दुपारी १. १५  जायला निघालो सुध्दा .  नाहीतर आधी दोनद तयारी केली  पण जाने झाले नाही( आले देवाजीच्या मन, तेथे कुणाचे चालेना).
अचानक झालेल्या प्लान ची मजा  काही औरच असते अगदी अचानक आलेल्या पावसासारखी 🙂
बावधन ते देहू प्रवास कधी संपला ते कळलेच नाही.   आजूबाजूची हिरवळ बघण्यात देहू आले.
जिथे तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवली ते व  जिथून तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले ते मंदिर बघितले. इंद्रायणीच्या पात्राकडे बघूनच मन मोहित झाले होते. कधी एकदा त्यात पाय बुडवते असे झाले होते पण काठावर गेले तर पाणी खूप  आहे असा अंदाज आला आणी मनाला आवर घातला.  पिल्लुतर पाण्यात जाण्यासाठी त्रास देत होते. कसे बसे त्याला शांत केले.

ImageImageImageImage

 

तिथून आम्ही गाथा मंदिरात गेलो.  मंदिर नवीनच बांधलेले आहे पण खूप सुंदर आहे. बाहेर दोन मोठे हत्ती आहेत .समोर कारंजे आहे. अगदी भव्य दिव्य आहे. आत गाभार्यात तुकाराम महाराजांची एक भव्य व एक लहान मूर्ती आहे. आत सगळ्या गाभार्यात व वरच्या मजल्यावर सुद्धा महाराजांची गाथा संगमवर  भिंतीवर  लिहिलेली आहे. वाचून अगदी मन भावविभोर होऊन गेले.

तिथे आलेले वारकरी राम्कृश्न्हारी चा जयघोष करत होते पण माझे मन मनातल्या मनातच म्हणत होते. मोठ्याने म्हणायला बुद्धी
परवानगी देत नव्हतॆ 😦
IMG_20130620_142804 IMG_20130620_142906 IMG_20130620_142950 IMG_20130620_143025 IMG_20130620_143041 IMG_20130620_145416 IMG_20130620_145540 IMG_20130620_145709 IMG_20130620_145723
तिथून आम्ही आळंदी ला गेलो. तिथे देहुपेक्षा खूप गर्दी होतॆ.

इंद्रायणी ला खूप पाणी होते. अगदी बघूनच मन प्रसन्न होत  होते.
माउलीच्या  समाधीवर नतमस्तक होऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो,  खूप मोठा आनंदाचा ठेवा सोबत घेउन.

One thought on “देहू आळंदी”

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s