पिल्लायन-भाग2

पिल्लु: आsssई spider
आई: काही नाही करित तो Spider
पिल्लु: आई हा spider मला चावला तर मी Spiderman  बनणार का?
(आई विचारात)
आई: अरे हा छोटा spider आहे. spiderman बनण्यासाठी  खुप खुप मोठा spider चावावा लागतो.
(पिल्लु समाधानी)
थोड्यावेळाने
पिल्लु: आई, Batman होण्यासाठी काय चावले पाहीजे?
(आई विचारात)
आई: Batman होण्यासाठी मोठा bat म्हणजेच वटवाघुळ चावावे लागते. ते रात्रीलाच बाहेर येते. त्याचे डोळे खुप मोठे असतात.
(आई जवळ असलेली सगळी माहीती थोडीशी भयानक करुन सांगते.)
(पिल्लु परत समाधानी)
पिल्लु: आई आई
(आई काळजीत, आता काय विचारतोय हा?)
पिल्लु: Superman बनण्यासाठी काय चावावे लागते?
(आईला उत्तर माहीती नाही व काय सांगावे ते सुचतही नाही)
आई: (आपले शेवटचे शस्त्र बाहेर काढते) superman बनण्यासाठी खुपखुप जेवावे लागते.
पिल्लु शांतपणे बाहेर खेळायला पळतो.

पिल्लायन भाग1

मोठे पिल्लु जे 4.5 वर्षाचे आहे ते कधीकधी खुप मोठे झाल्यासारखे वागते, जाणते अजाणतेपनी.

लहान पिल्लु 1.5 वर्षाचे आहे, त्यामुळे तिच्या बाळलीलामुळे बरेच वेळा घरी गोंधळाची परिस्थीती निर्माण होते. कधीकधीतर युद्धसाद्रुष्य परिस्थीती निर्माण होते. त्यात मोठ्या पिल्लाचापण हातभार असतो बरेचदा.
एकदा लहान पिल्लु खुपच रडत होते. माझी चिडचिड होत होती. पिल्लु शांतच होत नव्हते. माझ्या रागाचा पारा चढुन राहीला होता. मोठ्या पिल्लाला काय वाटले काय माहीती. तो लहान पिल्लाला समजावुन राहीला होता. तिला म्हणत होता. पिल्लु रडु नको. नाहीतर तुझी बुद्धी कमी होईल. लहान पिल्लाला किती समजले माहीती नाही पण लहान पिल्लु शांत झाले होते.
मला दोन्ही पिल्लांचे खुपच कौतुक वाटत होते.
😍😍😍