लग्नानंतरचे प्रेम

लग्नाला 4-5 वर्ष झाल्यावर, प्रेम व्यक्त करायची समीकरणे बदलतात.दिवसातुन दहा वेळा  love you म्हणने म्हणजे प्रेम नसुन ते अव्यक्तपणे व्यक्त करणे म्हणजे प्रेम.

प्रेम व्यक्त होते स्पर्शातुन, शब्दातुन, नजरेतुन, स्वयंपाकाला दिलेल्या दादेतुन, छान दिसत आहेस/आहात या शब्दांतुन, जपुन जा, लवकर या/ये या शब्दातुन.

यानेच

लग्न मुरल्यासारखे वाटते, l love you /I  miss you  सारखे उथळ उथळ नाही

पिल्लायन भाग1

मोठे पिल्लु जे 4.5 वर्षाचे आहे ते कधीकधी खुप मोठे झाल्यासारखे वागते, जाणते अजाणतेपनी.

लहान पिल्लु 1.5 वर्षाचे आहे, त्यामुळे तिच्या बाळलीलामुळे बरेच वेळा घरी गोंधळाची परिस्थीती निर्माण होते. कधीकधीतर युद्धसाद्रुष्य परिस्थीती निर्माण होते. त्यात मोठ्या पिल्लाचापण हातभार असतो बरेचदा.
एकदा लहान पिल्लु खुपच रडत होते. माझी चिडचिड होत होती. पिल्लु शांतच होत नव्हते. माझ्या रागाचा पारा चढुन राहीला होता. मोठ्या पिल्लाला काय वाटले काय माहीती. तो लहान पिल्लाला समजावुन राहीला होता. तिला म्हणत होता. पिल्लु रडु नको. नाहीतर तुझी बुद्धी कमी होईल. लहान पिल्लाला किती समजले माहीती नाही पण लहान पिल्लु शांत झाले होते.
मला दोन्ही पिल्लांचे खुपच कौतुक वाटत होते.
😍😍😍

Washing Machine घ्यायची आहे हो

मला Washing Machine घ्यायची आहे.

ज्यांना Washing Machine ची माहिती आहे त्यांनी क्रुपया मदत करावी.

तशी घरी कपडे धुआयला बाई आहे पण पैश्याला काहीतरी काम पाहिजे ना? म्हणुन हा Washing Machine घेन्याचा घाट घातलेला आहे.

आईकडची Washing Machine semi-automatic  आहे त्यामुळे automatic च्या result बद्दल काहिही माहिती नाही आहे.

मदतीच्या अपेक्शेत आहे 🙂 🙂 🙂

नवरोबा चा वाढदिवस

काल नवरोबा चा वाढदिवस होता.
कालच सकाळी आम्ही अम रावती वरुन परत आलो. त्यामुळे  वाढदिवसाची तयारी करायला विशेष वेळ नाही मिळाला.
संध्याकाळी त्याच्यासठी छा न लाल गुलाबाचा बुके घेतला व तो त्याला ओफीस मधेच दिला.
नंतर त्याला घरी आणले व त्याच्या नकळत त्याच्यासाठी आणलेला कप ज्यावर आमच्या दोघांचे फोटो होते तो दिला सोबत आमच्या लग्नाच्या वेळेसचा एक फोटो एन्लार्ज करून दिला 🙂 कप बघून तर नवर्याच्या चेहर्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

नंतर त्याला म्ह्टले की आपण बाहेर फिरायला जाऊ व त्याला
Up & Above ( चांदणी चौक, पुणे) मधे नेले ( हे सगळे त्याला surprise होते)
तिथे टेबल मी नवर्याच्या मित्राच्या मदतीने आधीच बुक करून ठेवला होता सोबत केक पण आणून ठेवला होता.आम्ही तिथे गेल्यावर वेटर ने केक आणला.
नवरा तर बाहेरचा व्हीव बघुनच खूप खुश झाला होता.
ते हॉटेल उंचावर आहे व तिठुन रात्रीचे छान सौंदर्य दिसत होते सोबतच बाहेर थोडासा पाउस पण सुरू होता.
नवर्याच्या चेहर्यावरओसांडणारा आनंद बघुनच माझे मन तृप्त झाले होते. तिथेपहीले मी Green Ferry (Pineapple juice with Vanilla ice-cream) घेतले सोबत वेज अनारकली खाल्ले.
त्यानेच तर पोट भरले होते म्हणून मग नंतर वेज बिरयानी घेतली.
तृप्त झालेले पोट  व मन घेऊन दोघेही हर्ष रेस्टोरेंट, कोथरूड ला गेलो तिथे खूप छान कॅड बी घेतली.
व नंतर मस्त मसाला पान खाल्ले.

एकंदरीत  कालची संध्याकाळ खूप छान गेली अगदी न विसरता येणार अशी……..

साखरपुड्याचा पहिला वाढदिवस

काल आमच्या साखरपुड्याला एक वर्ष पुर्ण झाले.

त्यामुळे गेल्या २०-२५ दिवसापासुन रात्री १०च्या नंतर येनारा माझा नवरा काल

संध्याकाळी ७.४५ला कामापासुन मोकळा झाला व आम्ही ८ वाजता ओफीस मधुन बाहेर जाण्यासाठी निघालो.

बाहेर भरपुर फिरलो व नंतर भरपुर खाल्ले 🙂

खाल्लेले पचण्यास थोडासा हातभार लावावा म्हणुन झेड ब्रीज वर २-३ चक्कर लावली.

तेवढाच आपला पोटाला हातभार हा उदात्त हेतु.

एव्हाना पावसाने त्याच्या अस्तित्वाची दखल घेन्यास भाग पाडले व लवकरात लवकर आपले घर जवळ करावे

या हेतुने आम्ही पावसातच घरी जाण्यास निघालो आणी लवकरच पावसाने रौद्ररुप धारण करायला सुरुवात केलेली होती.

नवरोबाला म्हणाली की कुठेतरी थांबु या व पाउस थांबल्यावर घरी जाउया पण नवरोबा म्हणाला की लवकरात लवकर घरी जाउया उगाच पाउस अजुन वाढला तर पंचाईत होईल. तसेच पावसात भिजत निघालो (अर्थातच गाडीवर).

पावसाचा जोर खुप वाढलेला होता. घरी पोहोचायला जवळ्पास ४५मिनीट लागले. घरी पोहोचे पर्यंत चिंबचिंब भिजलेलो होतो सोबतच लाईटपण गेलेली होती.

बाहेर बघीतले तर पाउस अजुनच वाढलेला होता. वाटले बरे झाले घरी यायला निघालो ते जर थांबलो असतो तर अडकलो असतो (अर्थातच श्रेय नवरोबा).

पावसात पण भिजण्यात खुप मजा आली. नवरा म्हनाला पण आज तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण होत आहेत (बाहेर फिरायला जाणे, पावसात भिजणे…)

आमच्या साखरपुड्याच्यादिवशीपण पाउस आला होता….

एकंदतीर कालची संध्याकाळ खुप छान गेली………..

माझे कोकण दर्शन..केळ्शी

दीपक व महेन्द्रजी च्या अभिप्रायामुळे आमचया कोकण प्रवासाबद्दल पुन्हा विस्तृत लिहायला घेतले.
जुनिच पोस्ट मॉडीफाय करनार होते पन नंतर विचार केला की सगळे विस्तृत लिहिनारच आहे तर
नव्याने सुरुवात करावी….असो…

फिरायला कोकनात जायचे ठरवले होते पन जायचे कुठे हा यक्ष प्रश्न होता……
कारण अलीबाग,कीहिम,कशीद,मुरुद-जंजीरा,गन्पतिपुळे……सगळ्या क्राउडेड प्लेसेस …
कालांतराने ओफ़िसमधे मधे पन आम्ही कुठेतरी फिरायला जानार हे माहिती झाले होते(नवरयाचे व माझे ओफिस एकच आहे 🙂 )
त्यामुळे सजेशन चा पाउस पड़ून राहिला होता…..कुनी म्हने इथे जा कुनी म्हने तिथे जा …….
त्यामुळे दोघेहि वैतागलेलो होतो…..
शेवटी नवर्याचा मित्र मदतीला आला व आम्हाला केळशि जान्यास सांगिताले कारण आम्हाला जास्त गर्दिच्या ठिकानी जायचे
नव्हते.तर मित्राच्या सांगन्याप्रमाने केळशि रिमोट प्लेस आहे.नवर्याने जाण्याची जुजबी तयारी केली(गाडी सांगितली राहण्याचे तिथे गेल्यावर बघू म्हणाला..जर काहीच व्यवस्था नाही झाली तर गाडीत झोपु म्हणाला :).
असो…

Konkan Darshan Map

गाडी नवर्‍याच्या मित्राची होती व त्याला नवर्‍याच्या बिनधास्त स्वभावाची माहिती होती त्यामुळे त्याने कोकण दर्शन चा नकाशाच दिला…

३ एप्रिल ला १० वाजता आमचा प्रवास सुरू झाला.
बाणकोट वरुन केळ शी ला आम्ही २.३० दुपारी पोहोचलो.प्रचंड उन होते त्यात आमची गाडी एसी नव्हती.उन्हाचे चटके खातच आमचा प्रवास सुरू होता व फक़त नाष्टा च केला होता.मधे जेवण्यासाठी थांबले तर खूप वेळ जाईल व पोहोचायला उशीर होईल म्हणून फक्त पाणी व चटरपटर खाणे सुरू होते.
के ळ शी ला  पोहोचे पर्यंत वाट लागली होती.

नवर्‍याच्या मित्राने राहण्यासाठी एक जागा सांगितली होती व खूप कौतुक पण केले होते तर आम्ही तिथे एका घर वजा हॉटेल मधे राहिलो.पुण्याईनाव होते “पुण्याई” पाहताच क्षणी नाव आवडले व तिथे चौकशी केली.
एका साठी उलटलेला माणूस बाहेरच बसलेला होता व त्याने आम्हाला रूम वगेरे दाखवली….नापसंत करायचा प्रश्नच नव्हता…

बापरे जरा जास्तच खोलात जातआहे मी…..
आता  लिहायचा कंटाळा आलेला आहे त्यामुळे….. fast forward पळनार आहे.

तर तिथे गेल्याबरोबर जेवण मिळाले….मी तर तूटूनच पडले होते.मेनु तसा साधा पण छान होता.सोबत सोलकढी होती….:)
तसेही मी ठरवले होते की कोकणात गेल्यावर कोकणी पद्धतीचे जेवणार..

थोडा आराम केल्यावर आम्ही (मी व नवरा) बीच वर गेलो.अगदी निर्मानुष्य बीच आहे.

आमचेच राज्य 🙂 होते बीच वर…..
भरपूर डुंबलो पाण्यात…….

संध्याकाळी ७ वाजता रूम वर पोहोचलो. रात्रीचे समुद्रकिणरयावर जाण्याची नवर्यची खूपच इच्छा होती त्यामुळे रात्री ९ वाजता समुद्रावर दोघेच गेलो …बापरे….किती भयानक आवाज येतो रात्री …समुद्रासमोरचे सुरू चे बन तर भयावह दिसत होते.प्रचंड घाबरले होते मी.व लवकरच नवर्‍याला रूमवर परत नेले.
सकाळी लवकर उठून सूर्योदय बघायला जाण्याचे ठरवून   झोपी गेली.

पण सकाळी ८ वाजता उठल्यामुळे सूर्योदय मनातल्या मनातच राहिला….. 🙂

सकाळी त्या गावी सुनामी मुळे वाळूची टेकडी तयार झालेली आहे ती बघण्यसाठी ९  वाजता निघालो.

तिथे एक माणूस होता त्याने सांगितले की ३००-४०० वर्षापूर्वी इथे गाव होते व सुनामीमुळे ते गाडल्या गेले.

तिथे एक विहिरीचे अवशेष दिसतात…

आम्ही सुरुच्या बनात गेलो व समोरच समुद्र होता..
मग काय पुन्हा पाण्यात डुंबलो…

दुपारी १२.३० रूम वर पोहोचलो..जेवण व आराम झाल्यावर कर्दे ल जाण्यासाठी ३ .३० ल निघालो……

पुण्याई

केळशी, कर्दे …अविस्मरणीय अनुभव

लग्नानंतर आम्ही कुठेही फिरायला गेलो नव्हतो म्हणून नवर्याने त्याच्या व्यस्त कार्यक्रममधून वेल काढला व आम्ही
दोघे ३ एप्रिल ला केळशी बीच (कोकण)ला गेलो.
अविस्मरणीय अनुभव होता तो………
Kelashi Beachपहिले दीड दिवस केळशी ला राहिल्यावर आम्ही कर्दे बीच ला गेलो.
केळशी वरुन कर्दे ला जाण्याचा अनुभव तर शब्दातीत होता.
उजव्या बाजूला समुद्र व डाव्या बाजूला उंच डोंगर………

मधेच एखादी खाडी दिसायाची. कुठून दुरुनच झाडा मधून समुद्राचे दर्शन व्हायचे…
समुद्राचा तर लपंडावच सुरू होता.
खूप आनंद घेतला त्या प्रवासाचा………

काय लिहु अन्  काय नाही असे होत आहे आणि काहीच व्यवस्थित लिहिल्या जात नाही आहे.
काही काही अनुभव सांगताना शब्द पण अपुरे पडतात…….
असेच माझे झलेले आहे…