http://rammeetsasmita.info/

नवर्‍याच्या अथक प्रयत्नाने काळ आमची साइट अपलोड झाली.
सध्या त्यावर फक़त आमच्या लग्नाचे फोटो आहेत.उत्तरोत्तर अजुन बदल होणार.

http://rammeetsasmita.info/

Advertisements

पडले रे………

वाढदिवसाची झिंग (झिंग…नवर्याने दिलेल्य  surprise ची..तुम्हाला काय वाटले 🙂 )
डोळ्यात ठेवूनच मी १९ ला उठले व मुंबईला जायला निघाले कारण मुंबईला माझे कॉलेज चे जरा काम होते.दिवसभर काम झाले नाही म्हणून दुसर्या दिवशी करायचे ठरवले व रात्री पुण्याला परत ना जाता मावशिकडे घाटकोपर ला(मुंबई उपनगर) जायचे ठरवले.कोलेग पासून भवाचे ओफीस जवळच होते त्यामुळे त्याचा बाइक वर घरी जायला निघाले.घर जेमतेम 10मिन. अंतरावर असेल तोच रस्ता ओलांडणार्‍याला वाचविण्याच्या नादात आमची बाइक स्लीप झाली.मी मागे अनभीज्ञ बसलेली होती.गाडी पडले अन मी पण पडले………
२ मिन. काहीही सुजतच नव्हते…खूप त्रास होत होता अन मग हळूहळू कळायला लागले की उआजाव्या पायची खूपच आग होत आहे..
मग हॉस्पिटल…डॉक्टर…क्ष-किरण तपासणी…वगेरे वगेरे……
रात्री११.४५ ला आमची वरात घरी आली…
कुठेही काहीही झालेले नाही फक़त मुका मार आहे…….
डॉक्टर ने बेड रेस्ट सांगितलेली आहे…
नवरा तडक मुंबईला घ्यायला आला २० ला पुण्यात परत आले ले आहे.
व वेळेचा सदुपयोग ब्लॉग वर काहीतरी खरडण्यात करत आहे…..

लग्नाला १५ दिवसच झाले अन मी गाडीवारुन पडले त्यामुळे सासर माहेर दोन्हीही थोडे काळजीत आहेत….

Surprise

काल नवर्याच्या ओफीस मधे गेले होते. वाटले होते की नवरा ८ पर्यंत ओफीस मधून निघेल पण १० वाजले तरीही नवरा निघायचे काही नाव घेत नव्हता.पोटात ओरडाणारे कवळे सलाइन वर आलेले होते तरीही नवरा मात्र हालायालाही तयार नव्हता.मनात शिव्याची लाखोही वाहने सुरू झाले होते व कुठून दूरबद्धी झाले अन नवार्यासोबत आले असे वाटत होते पण एकटी जाउ पण शकणार नव्हते .अतिशय चिडून गेलेले होते…..शेवटी ११.१५ ला नवारोबा घरी जाण्यासाठी निघाले.इतका संताप आला होता की असे वाटत होते त्याला कच्चा खाउ की भाजून खाउ ….
तर आमची स्वारी त्याच्या बाइक जवळ आली आणि आता बाहेरच कुठेतरी खाउ असे सांगण्यात आले..मी मात्र गप्प..ऐकू येताच नाही आहे असे भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते.११.३० ला आमची स्वारी एका डोसा वल्याच्या गाडी जवळ आले(कारण इतक्या रात्री वेज हॉटेल उघडे नव्हते आणि मी पडले पक्की वेजी).उत्तापा सांगितला व सोबतच पुलाव सांगितला….मी मात्र मौन व्रत असल्यासारखी गप्प होते…नवरा मला बोलाविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता पण मी माझी मौन व्रतची खिंड सोडण्यास तैयर नव्हते.शेवटी आइस क्रीम पण झाले..मी मात्र गप्प…..शेवटी नवरा म्हणाला बाहेर फिरायला जाउ…रात्री ११.४५ ला फिरायला जायचे…..पण मी तरीही गप्प…शेवटी गाडीवर बसलो व  रस्ता जाईल तिथे जात होतो…..
नवरा म्हणाला की किती वाजले मी म्हटले १२…….
आणि कानात “Happy birth day to you” ऐकू आले….आता मात्र होता नव्हता तो सगळा राग कुतच्या कुठे पळाला.आकाश ठेन्गने वाटत होते…..खूपच आनंद झाला होता……काय करू अन काय नाही असे वाटत होते…घरापासून जवळपास ४-५ किमी गेलो असेल…..आणि नंतर आमचा पारतीचा प्रवास सुरू झाला .१किमी अंतर कापले असेल तोच गाडीची घर्घर सुरू झाली…आणि गाडी बंद पडली….बापरे…रात्रीचे १२.१५ झालेले अन गाडी बंद……नवरा म्हणाला की त्याच्या मित्रणी गाडी नेली होती आणि पेट्रोल भरले नसेल……बापरे….कशीबशी गाडी पुन्हा सुरू झाली १किमी गेलो नसेल तर पुन्हा बंद….सगळ्या आनन्दावर विरजण पडून राहीले होते.शेवटी नवार्यने गाडी रस्त्याच्या कडेला लावली व आम्ही रिक्षाने घरी पोहोचलो.घरी गेले तर बाहेरचे गेट उअघडेच होते.नवर्‍याला म्हटले पण की जाताना लावले नाही का??? नवरा बिचारा गप्प……
घरात पोहोचले तर नवीन शूज सोफ्याजवळ दियासले ..मी त्याबद्दल काहीतरी विचारणारच तर नवार्यने ओढतच बेडरूम कडे नेले.सगळ्या घरात अंधार होता…मी आपली बडबड करतच होते की लाइट नाही लावले होते का???वगेरे वगेरे…पण माझ्या प्रश्नांची आक्रमणे व्यवस्थीपणे तोपवून नवयाने मला बेडरूम च्या दारजवळ नेले…अन…
बापरे….अंगावर चमकीचे ,कचर्याचे फटाके काय फुटले…मी तर पार घाबरून गेले होते….मग कळले की नवर्यच्या ओफीस चे सगळे लोक घरात आहेत व मला सरप्राइज देण्यात आलेले आहे……..मग केक कापणे वगेरे झाले…सगळ्यांचे जेवण झाले..जे नवार्यने बाहेरूनच मागवले होते…….
अशरितीने माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा झाला………
नवार्यने दिलेले हे सरप्राइस खूपच आवडले होते…अगदी कधीही न विसरण्यासारखे……..
आयुष्यातील संस्मरनीय क्षण…………

अरे संसार संसार

५ फेब्रुवारी ला माझे शुभमंगल झाले आणि मी कुमारी अस्मिता ची सौ अस्मिता झाले.
आणि ११ फेब्रुवारीला आम्ही(मी, नवरा अन सासु) पुण्याला राहायला आलो.
सासु फक़त ८ दिवसच राहणार होती(सोबत म्हणून 🙂  ).
आणि मग आमचे खरेदी सत्र सुरू झाले.
अमरावती वरुन समान आणणे शक्य नसल्यामुळे सगळ्या नातेवाईकानी पैसे च दिलेत.११ तारखेला सोफा घेऊन सुरू झालेली खरेदी १६ ला देवघर घेऊन थांबली .खरे तर खरेदी ही कधीही न संपणारी वा थांबणारी आहे पण लग्नानंतर आवश्यक असणारे समान घेऊन आम्ही खरेदीला तातपुरता विराम दिला.
आणि आता आमच्या नवीन संसारास हळूहळू का होईना सुरूवात झालेली आहे व आम्ही दोघेही या नवीन जबाबदरीशी जुळून घेत आहोत.३-४ दिवस घरी राहून खूपच बोअर झाले होते( सासु पण कालच अमरावतीला परत गेली)म्हणून आज नवार्यासोबत त्याच्या ओफीस मधे आलेली आहे.