इंटरव्यू

काल एका ठिकाणी इंटरव्यू ला गेले होते.ज्याला नोकरी नसेल किवा जो current company बदलण्यासाठी जॉब शोधत असेल त्याला इंटरव्यू हा काय भयानक प्रकार असतो हे कळेल.एकतर जर त्या कंपनी मधे अजुन बरेच लोक आपण गेलयाआधी इंटरव्यू साठी आलेले असेल तर ते सगळे असे बसलेले दिसतात की जसे जेल मधे आहेत. नवीन कुणी इंटरव्यू साठी आले तर सगळे त्याच्याकडे अश्या नजरेने बघतात की असे वाटते की सगळे मिळून फाडून खातील.

(कारण अजुन एक कोम्पीतीटर आलेला असतो ना 🙂 ) मग ते फॉर्म भरणे आपला रीसुमे देणे. नंतर टेस्ट देणे(टेस्ट कुठे फक़त टेक्निकल असते तर कुठे आप्टिट्ट्ड + टेक्निकल,( varies from company to company).टेस्ट झाल्यावर टेस्ट च्या रेसल्ट साठी थांबणे हा जो काळ असतो ना तो खूपच परीक्षा बघणारा असतो कारण चिंता असते ती जर टेस्ट निघाली तर पुढच्या राउंड ची किवा वापस परत जाणे.

जर टेस्ट पास झाले तर technical interview आणि जर हा इंटरव्यू झाल्यानंतर जर तो निघाला तर काही दिवसाणी HR interview साठी जावे लागते.हा इंटरव्यू म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा प्रकार.
तुमच्या आवडी निवडी पासून कौटुंबिक पार्श्वभूमी पर्यंत काहीही विचारले जाते.नंतर महत्वाचा भाग म्हणजे salary negotiation .शेवटी HR तिच्या sweetartificial smile मधे म्हणतेNice talking with you

आणि मग आपण पुन्हा result ची वाट बघायची. जर clear झाले तर offer letter घेणे, जुन्या कंपनीत notice देणे नाहीतर दुसर्या कंपनीत इंटरव्यू साठी जाणे .पुन्हा process सुरू……..
खरच आपण college किवा शाळेत होतो टे दिवस किती छान असतात ना……
practical जगात वास्तवाचे खूपच चटके बसतात पदोपदी….या जगात हलव्या मनाला स्थान नाही..

तुम्ही किती practical आहात हे महत्वाचे…..

“To be or not tobe”

कधी कधी किती हेल्प लेस होतो आपण.काय करावे ते सुचताच नाही .
असे म्हटल्या जाते की आयुष्यात  खाड्या वळणावर दोन रस्ते येतात व
त्यातील योग्य वा अयोग्य आपण निवडायचा असतो पण माझी आता तर अशी स्टिती आहे की कोणताही मार्ग
नाही सापडत आहे व मी चालत आहे एक्टी ……………..
हा प्रवास कधी संपेल माहिती नाही….
खरच आयुष्यात “To be or not tobe” हे म्हणायची situation आलेली आहे.