मॉर्निंग वॉक 2

आठवड्याचे १-२ दिवस सोडले तर मी नियमीत पणे मॉर्निंग वॉक ला जाते 🙂
तर आज बर्‍यापैकी पार्क मधे फिरल्यावर तिथेच बसून थोडा आराम करायचे ठरवले व एका बाका वर स्थानापन्न झाले.सोबत कानात मोबाईल नामक यंत्रा मधून सुश्राव्य 🙂 गाणी ऐकत होते व मग काही काम नसले की आपण दुसरे काय काम करतात हे बघण्याचे काम करत असतो तर दुसर्‍याणा बघण्याचे 🙂 काम करायला सुरूवात केली कारण पु.ल. नि म्हटलेच आहे की जिवंत लोकाना बघण्याइतका चांगला जगात दुसरा टाइमपास नाही आहे. खरच मनापासून पटते की काही काम नसेल तर लोकाना बघावे प्रत्येकाची वेगळी तरहा, वेगळी चाल……

लोकाना बघण्यात एक वेगळीच मजा असते आनंद असतो.हसतील मला की ही वेडी काहीपण म्हणते पण निवंतपणे लोकाना बघा व त्यांच्या चेहरायावरचे हावभाव टिपाण्याचा प्रयत्‍न करावा व आपल्याच मनाप्रमाणे प्रत्येकाला analyze करून पाहावे.
वेगळाच अनुभव येतो ……

माझा मॉर्निंग वॉक

फेब्रुवारी मधे लग्न असल्यामुळे तोपर्यंत थोडे वजन कमी करावे असा उदात्त विचार 🙂 केला व आजपासून सकाळी मॉर्निंग वॉक ला जाण्याचे सुरू केले. तसे मॉर्निंग वॉक ला जाण्याचे खूप दिवसापासून ठरविले होते पण कोणतीही योजना अमलात यायला वेळ हा लागणारच 🙂 .तर आजपासून मॉर्निंग वॉक नामक युद्धावर आमची स्वारी निघाली.कोणत्याही मोहिमेला जायचे म्हणजे पूर्वतयारी ही आलीच  तसे आम्हाला ६ महिण्यापूर्वीचा अ  नुभव  गाठीशी होताच पण पराभवाला कोणतेही कारण मिळू नये म्हणून रात्रीच १ ट्रॅक पॅंट विकत आणून मोहिमेचा श्रीगणेशा केला.
सहजासहजी फत्ते होईल ती मोहिम कसली याचा प्रत्यय सकाळीच आला कारण ५.४५ चा गजर बंद करून पुन्हा झोपेच्या स्वाधीन कसे झाले हे कळलेच नाही अन अचानक उचकी लागावी असा जाग आला बघते तर काय ६.१५ झलेले. बापरे मोहिमेच्या पहिल्याच दिवशी माशी शिंकाली ,विचार केला नाहीतरी उशीर झालेलाच आहे तर उद्याच जावे 🙂 व आता थोडी झोप घ्यावी मग नंतर विचार आला की
शुभस्य शीघ्रम .शेवटी ब्लन्केट नामक कवच कुंडाले झुगारून दिले व ६.३० ला मॉर्निंग वॉक
ला बाहेर पडले . पार्क पर्यंत जाई पर्यंत ६.४० झाले . न जाणे का पण रस्त्यावरून जाताना सगळे माझ्याच कडे बघत आहे असे वाटले (प्रत्येक जन जणू नजरेने म्हणत होते की बघू किती दिवस नियमीत येते ते 🙂 ).
पार्क मधे पहिलाच राऔंड घेत होती तर १ अलसेशियन कुत्र जवळ सुप्र भात म्हणायला आले. मी जागच्या जागीच गोठून गेले पण मग त्या कुत्र्याच्या मालकाने त्याला आवाज दिला विचार केला होता की आजचा बहुदा मॉर्निंग वॉक चा पहिला व शेवटचा दिवस राहणार(जर ते कुत्रे चावले असते तर) पण बहुदा आज नशीबची साथ होती.
असो तर आजचा मॉर्निंग वॉक एकंदरीत निरवीघ्न 🙂 पार पडला.

गाठीशी