Archive for the ‘वाचाल तर वाचाल!!!’ Category

काल जुनी डायरी हातात घेतली.
बरेच दिवसांपासुन विचार करत होते की डायरी वाचायची पण वेळच मिळत नव्हता.काल खुप वेळ होता असे नाही पण रात्री घर आवरता आवरता सहज लक्श डायरी कडॆ गेले.
चाळता चाळता लक्श माझ्या आवडत्या कवितेकडॆ गेले.मंगेश पाडगावकरांची आम्लेट.
ती कविता इथे देत आहे….

आम्‍लेट
कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली,” पिल्‍लूबाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले,” आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

– मंगेश पाडगावकर

अगदी रीअलेस्टीक आहे ना कविता…..
मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता आहे ही…….
माझा भाउ मला ही कविता वाचायला लावायचा.तो म्हणायचा की मी खुप छान वाचते ही कविता. महिन्यातुन एकदा कविता वाचन चा कार्यक्रम असायचा आमचा.आता तर जवळपास नउ-दहा महिन्यांनंतर डायरी हातात घेतली.काळाप्रमाणे किती बदलतो आपण.
का बदलतो?
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी रोज मर मर मरतो आणी जगायचे विसरुन जातो.

Advertisements

प्रिया तेंडुलकर चे काळ जावे त्यांच्या वंशा हा कथा संग्रहा वाचला .
सगळ्या कथा स्त्रियांशी संबधित होत्या.पण मला तिचे लिखाण थोडे भडकाच वाटले.
कदाचित आपल्या जे विचारात येते ते आपण लिहितो आपण जसे राहतो अर्थात ज्या वातावरणात वाढतो
ते आपल्या विचारात पर्यायाने आपल्या लिखाणात येते असे मला वाटते(अर्थात हे चुकीचे पण असु शकेल)
त्यामुळे मोकळ्या वातावरणाचा वा मॉडर्न संस्कृतीचा त्या लिखणावर पगडा वाटला.
जसे आपण सहज बोलतो तसे घटास्पोट घेण्याचे दाखवले आहे त्या कहाण्यामाधे.
खरच घटास्पोट घेणे इयतके सोपे असते का?(अर्थात ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर देणार ,जिचे लग्नाच व्हायचे आहे ती).
काहीही असो पण स्त्रीयानच का सगलेसाहन करावे लागते हा मात्रा एक अणूत्तरीत प्रश्ना आहे