माडी पोर्णिमा

आज माडी पोर्णिमा आहे.गावी असते तर मस्त संध्याकाळी घरी बाहुल्या बसविल्या असत्या.आता आजुबाजुला कुणीही लहान राहत नाही. त्यामुळे बाहुलीचे गाणे आई, मी, बाजुच्या काकु व त्यांच्या ३ सुना यांनी मिळुन म्हटले असते.आम्ही नेहमीच खुप मजा करत असु या दिवशी.आई खुप छान छान खाउ करायची. अगदी भरपेट द्यायची.सोबत ते ५-६ जणींचे मिळुन गाणे म्हणने. ति गाणी वर्षातुन फ़क्त एकदाच म्हटली जातात त्यामुळे एखादे गाणे विसरुन जायचे व पुढचे यायचेच नाही. मग ते गाणे तसेच मधे सोडुन नविन गाणे सुरु करायचो सोबत आई आणी काकुंचे त्यांच्या बालपणातील गाण्यांची सोबत असायची अश्या कितीतरी आठ्वणींनी मन भरुन आलेले आहे. असे वाटत आहे की नोकरीच्या नादात आपण खुप मोठा आनंद गमावत आहे. मला तरी या छोट्या छोट्या सणांची माहिती आहे पण माझ्या पुढच्या पिढीला हा आनंद नाही मिळनार.

हळुहळु ती गाणी मनात येत आहे.

पहिली ग पुजा बाई,

कारल्याचे बी पेर ग सुन बाई,

या डवरा या राणी रुसुन बैसली कैसी (माझे आवडते गाणे),

एक लिंब झेलु बाई दोन लिंब झेलु,

अडकित जाउ खिडकित जाउ,

हत्तीच्या सोंडेवर पेरीला नगरअशी अजुन कितीतरी गाणी आहेत.

ही गाणी कुठे वाचुन पाठ नाही झाली तर ती तशीच पिढ्या न पिढ्या हस्तांतरीत(?) झालेले आहे त्यामुळे त्यांच्या उच्चारांमधे चुका आहेत पण ज्या लयीत ते म्हटले जाते ती लयच खुप सुंदर वाटते.
खुप लिहावेसे वाटत आहे पण मन भरुन आलेले आहे घरच्या आठ्वणींनी 😦 😦 😦

दसरा

दसरा

असत्यावर सत्याचा विजय…..

अधर्मावर धर्माचा विजय…..

वाईटावर चांगल्याचा विजय…..

हा दसरा तुम्हा सगळ्यांच्या आयुश्यात सुख, संपत्ती, भरभराट व शांती घेवुन होवो

हिच त्या आदीमाया आदीशक्तीला प्रार्थना…

गणपती बाप्पा मोरया

आज गणपती विसर्जन…
बुद्धी दात्या गणरायाला भावपुर्ण निरोप..
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया…

मोरया मोरया आम्ही बाळ तान्हे,

तुमचीच सेवा करु काय जाणे,

अन्याय माझे कोट्यानकोटी,

मोरेश्वरा बा तु घाल पोटी!!

(विनय जोशी ने कँमेराबद्ध केलेले पुन्यातील काही गणपती….)

This slideshow requires JavaScript.

आज हरितालिका

पार्वतीने शंकर हाच नवरा मिळावा म्हणुन केलेले व्रत.
प्रत्येकच पुजा, सण, समारंभ करतांना श्रद्धा महत्वाची.
आज कर्मठपणे पुजा करण्यापेक्शा श्रद्धेने पुजा करावी असे मला वाटते कारण
दुसर्यांना दाखविन्याच्या अट्टाहासापायी सण साजरे करताना त्यातली श्रद्धा लोप पावत असुन
फक्त औपचारच उरतात.
आई नेहमी म्हनते की सगळे सण डोळसपणे करावे.
जे पिढ्यानपिढ्या सुरु आहे ते करन्यापेक्शा आजच्या परिस्थितीत काय व्यवहार्य आहे ते ठर्वुनच सगळे सण साजरे करावे.
त्याकाळी स्त्रिया घरीच असायच्या.जरी घरीच त्यांना भरपुर कामे असायची तरी पण उपवासामुळे थकवा आला, बरे नाही वाटले तरिही घरी असल्यामुळे काळजी नसायची पण तेच उपवासाचे नियम आता लावुन चालनार नाही.सकाळी घरातुन ८-९ वाजता निघुन रात्री ८ पर्यंत घरी येनार तर दिवस भर काहीही न खाता, कमीतकमी फळे तरी खावी. 🙂
आज सकाळीच आईचा फोन आला. तिने सांगितले की आतापर्यंत जसे उपवास केले ते केले पण आता
कडक उपवास करायचे नाही.लग्नानंतरची पहिलीच हरितालिका आहे तर आता जे करशील तेच पुढे करायचे म्हणुन
आज दिवसा एकदा काहीतरी खायचेच.
तिने तर एकदम आद्न्याच दिली म्हटले आता तरी तिला हो म्हणुया मग संध्याकाळी किती भुक लागली यावर खायचे की नाही हा निर्णय घेउया.
तरीपण मी पुजा वगेरे छान केली घरी जे उपलब्ध होते ते त्या साहित्यानेच पुजा केली.( थोडी घाईतच केली कारण ओफिसला जायचे होते.) आणी त्या हरितालीकेला सांगितले जमले तर रात्री कहाणी वाचेल आणी आम्हा उभयतांचे आयुष्य आनंदी व निरोगी जावु दे !!!!

माझी पहिली मंगळागौर

काल माझी पहिली मंगळागौर होती, त्यामुळे रविवार पासुनच उत्साह अगदी ओसंडुन वाहत होता.
त्याला नवर्याची पण सोबत होती (बाजारात जाउन सामान वगेरे आनायला)
रविवारी न आनलेले सामान आनायला पुन्हा सोमवारी बाजारात गेलो. खरेतर नवर्याला बरे नव्हते वाटत.
पण आला हो नवरा सोबत( असे झाले ना की नवर्याचे आपल्यावर खुपच प्रेम याचा पुन:प्रत्यय येतो)
मंगळ्वारी सकाळी लवकर उठुन 🙂 (लवकर म्हनजे नेहमीपेक्शा ३०मि.आधी उठले, त्याचाच किती आनंद 🙂
सगळे आवरुन पुजा आटोपली.आणी हो महत्वाचे म्हणजे उपवासपण केला तो पण कडक (नवरोबा बघा तुमच्यासाठी आम्ही किती खस्ता खातो ते).
मंगळागौरची कथा वाचली.माझा त्या कथेवर विश्वास असन्यापेक्शा सगळ्या करतात म्हणुनच मी ती वाचली.
पण पुजा मात्र खुप श्रद्धेने केली शेवटी नवर्याच्या दिर्घायुश्याचा प्रश्न आहे.यावर मात्र माझा विश्वास आहे की आपण श्रद्धेने केले ना तर त्याचा फायदा होनारच.असो…..
रात्री मात्र खुपच भुक लागली होती. कसेतरीच वाटत होते, शेवटी नवरोबाच्या परवानगीने (मुद्दामच विचारले, नवरा चुकुनही नाही म्हणनार नाही याची खात्री होती म्हणुन 🙂 ) रात्री फ़राळ केला.
शेवटी त्या मंगळागौर जवळ मागितले की “आयुश्यात कितीही संकटे आली तरिही आम्हा उभयतांचा एकमेकांवरचा विश्वास मुळीच कमी होउ नये.”

रामनवमी

आज रामनवमी… चैत्र शुद्ध नवमी ला दुपारी १२ वाजता अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामा चा जन्म झाला.

कधीकधी असे का होते की लिहायचा विषय असतो मनात पण लिहायची इच्छा होत नाही.
माझे पण असेच होत आहे आज.
त्यामुळे कधीतरी नक्की लिहीन श्रीरामावर…

मर्यादा पुरुषोत्तम,एकपतणी,एकवचणी,एकबानी श्रीरामाला माझे त्रिवार वंदन ….