आम्‍लेट

काल जुनी डायरी हातात घेतली.
बरेच दिवसांपासुन विचार करत होते की डायरी वाचायची पण वेळच मिळत नव्हता.काल खुप वेळ होता असे नाही पण रात्री घर आवरता आवरता सहज लक्श डायरी कडॆ गेले.
चाळता चाळता लक्श माझ्या आवडत्या कवितेकडॆ गेले.मंगेश पाडगावकरांची आम्लेट.
ती कविता इथे देत आहे….

आम्‍लेट
कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली,” पिल्‍लूबाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले,” आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

– मंगेश पाडगावकर

अगदी रीअलेस्टीक आहे ना कविता…..
मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता आहे ही…….
माझा भाउ मला ही कविता वाचायला लावायचा.तो म्हणायचा की मी खुप छान वाचते ही कविता. महिन्यातुन एकदा कविता वाचन चा कार्यक्रम असायचा आमचा.आता तर जवळपास नउ-दहा महिन्यांनंतर डायरी हातात घेतली.काळाप्रमाणे किती बदलतो आपण.
का बदलतो?
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी रोज मर मर मरतो आणी जगायचे विसरुन जातो.

मनाला भावलेले काहीतरी

आज खुप सुंदर मेल आला होता.
त्यात व.पु. चे काही निवडक व्याक्य होती.
मनापासुन आवडली व सगळ्यांना सांगाविसी वाटली……
किती सुंदर आहे…खरच…समोरच्या व्यक्तीनं तुमच्यासारखं का व्हाव?
आणी आपण अविरत प्रयत्न करत असतो समोरच्याला बदलन्याचा, प्रवाहाविरुद्ध पोहन्यास प्रव्रुत्त करायचा प्रयत्न……
(ही वाक्य व.पु.ची आहे की नाही हे मी पडताळुन पाहिलेले नाही)

Me Myself

read death post by Bhunga.
Excellent……
and that post foreced me to think on my life, my family, friends and all around me…..
and then I asked some questions to myself…
Why we hurt people especially our nearest & dearest eventhough they are precious to us?
Why?
to satisfy EGO,to take revenge,  to tell them our importance………
I didn’t find concrete solution rather I dont want to find the solution ( as I love myself and dont want
to speak/think anything against myself)
Did any GOD bless you eventhough you hurt people by your harsh behaviour?
My mom used to say “दगडाचे देव पुजन्यापेक्शा जिवंत माणसाला पुजावे “…..
Since, yesterday lots of questions in mind….
having only 1 answer
.
.
.
.
.
I have to change myself
(look how Egoestic I am, uses of myself many times shows this)
I have to change…
I have to change…
I have to change…
Life is very small to love..

गाडी हरवली हो!!

काल better half च्या मित्राकडे गेले होतो चिन्चवड ला.त्यान्च्या घरी गेल्यावर ठरवले की मोरया गणपती ला जाऊ.
नन्तर आम्ही बिग बाझारा ला गेलो व तिथेच खुप उशीर झाला.
मित्राच्या घरी ६ वाजता परत आलो व तिथुन घरी कोथरुडला परत जायला ६.४५ ला निघालो.
खाली parking lot ला येउन बघतो तर काय आमची गाडी (Splendor) तिथे नाही.
बापरे माझ्या तर पायाखालची जमिनच सरकली.
आता काय करायचे.
सगळीकडे शोधाशोध झाली. मला तर आता पुढे काय करायचे हाच प्रश्न पडला.
खुप काळजी वाटत होती.एकदा गाडी चोरी गेल्यावर पुन्हा परत मिळने हा तर कल्पना विलासच आहे (आपल्या पोलिसान्चा दराराच आहे तसा). खुप वाईट वाटत होते. पोलिस कम्प्लेन्ट करुन better half व त्याचा मित्र त्याच्या घरी परत आला तर बघतो तर काय…
जिथे गाडी चोरी जान्याच्या आधी लावलेली होती तिथेच ती तशीच परत ठेवलेली दिसली.
माझ्यातर जिवात परत जिव आला….. 🙂 🙂 🙂
better half चा मित्र म्हनत होता की मोरया गणपती ला जाऊया आता.
मला तरी वाटले की आम्ही पहीले गणपतीला जातो म्हटले आणी मग नन्तर रद्द केले म्हनुनच असा मानसिक त्रास झाला आम्हाला.
नन्तर मग गणपतीला गेलो १किलो पेढे घेतले….
बाकी काय 
मोरया मोरया आम्ही बाळ तान्हे,
तुझीच सेवा करु काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तु घाल पोटी !!
गणपती बाप्पा मोरया !!!

अन्गी वनवा चेतला

मन जागेवर नसले म्हणजे आवडते गाणे पण ऐकावेसे वाटत नाही.
गेले २ दिवस झाले माझे चित्त मुळिच ठिक नाही आहे.
खुप प्रयत्न करत आहे मन जागेवर येन्यासाठी पण व्यर्थ..
आवडती गाणी ऐकायचा प्रयन्त केला पण हाय रे देवा त्यातील एक पण गाणे ऐकावेसे वाटत नाही आहे.
जे गाणे मी दिवसातुन १०-१५ वेळा ऐकत असेल ते एकदा पण ऐकावेसे वाटत नाही.
सारखे गाणे बदलने सुरु आहे.
महाजालावर नेहमीच काहीतरी वाचायचा प्रयत्न असतो पण २ दिवसात काहीही वाचावेसे वाटत नाही आहे.

वाटते…
चान्द मातला मातला
त्याला कशी आवरु,
अन्गी वनवा चेतला
त्याला कशी सावरु
…..

शेवटी वेळच माझे मन जागेवर आणेल फ़क्त तोपर्यन्त कुणालाही माझा त्रास होऊ नये असे वाटते…

दिल तो बच्चा है जी….

कधी कधी एखादे गाणे मनाला खुपच भिडते का ते माहिती नाही
पण एखाने गाणे खुप आनन्द देते.
डोळे बन्द असताना कुणीतरी चेहर्यावरुन अलगदपणे मोरपीस फिरवत आहे असे वाटते.
असेच एक गाणे आहे जे मला सद्ध्या खुपच आवडत आहे.
इश्किया मधील दिल तो बच्चा है जी….
मी अजुन तो चित्रपट नाही बघितला आणी ते गाणे पण नाही बघितले पण
हे गाणे खुपच आवडत आहे.
गाण्यातील एक एक शब्द काळजाला जाउन भिडतो……
गाणे ऐकत ऐकतच ही पोस्ट लिहीली.
खरतर काय लिहावे हेच कळत नव्हते पण गाणे ऐकताना वाटत होते की काहीतरी लिहावे…
हे गाणे ऐकताना एक वेगळेच फिलिन्ग येते न वर्णन करता येन्यासारखे….

ऐसी उलझी नजर उनसे हटती नही
दात से रेशमी डोर कटती नही
उम्र कब कि बरस के सफ़ेद हो गयी
कारी बदरी जवानी की चटती नही
वल्ला ये धडकन बढने लगी है
चेहरे की रन्गत उडने लगी है
डर लगता है तन्हा सोने मै जी..
दिल तो बच्चा है जी, दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी……….
किसको पता था पेहलु मे रखा
दिल ऐसा पाजी भी होगा
हम तो हमेशा समझते थे कोई
हम जैसा हाजी ही होगा
हाय जोर करे, कितना शोर करे
बेवजा बाते पे ऐवे गौर करे
दिलसा कोई कमीना नही
कोई तो रोके, कोई तो टोके
ईस उम्र मे अब खाओगे धोखे
डर लगता है इश्क करने मै जी
दिल तो बच्चा है जी, दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी……
ऐसी उदासी बैठी है दिल पे
हसने से घबरा रहे है
सारी जवानी कतरा के काटी
पिरी मै टकरा गये है
दिल धडकता है तो ऐसे लगता है वो
आ रहा है यही देखता ही ना वो
प्रेम की मारे कटार रे
तौबा ये लमहे कट ते नही क्यु
आखोसे मेरी हट्ते नही क्यु
डर लगता है मुझसे केहने मै जी
दिल तो बच्चा है जी, दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी…..

चित्रपट: इश्किया
गायक: राहत फ़तेह अली खान
सन्गीत: विशाल भारद्वाज
गीतकार: गुलजार

गारवा…….

सुन्दर वातावरण आहे आज.
हवेत गारवा आहे पण तो बोचणारा गारवा नसुन मन उत्साहित करणारा आहे.
असे वाटते की मस्त बाहेर फिरायला जावे.
बाईक वर छान दुर भटकायला जावे.
एखाद्या शान्त ठिकानी एकमेकान्चे हात हातात घेउन फक्त डोळ्यानीच बोलायचे.
हवेतील गारवा मस्त पिउन त्रुप्त व्हावे आणि नन्तर गरम गरम कान्दा भजी खावित…..

हा असा सान्ज गारवा
वाटे मनाला हवा हवा
अश्या धुन्द वेळी
तुझा हात माझ्या हाती हवा……

(साभार गारवा-मिलीन्द इन्गळे)