साखरपुड्याचा पहिला वाढदिवस

काल आमच्या साखरपुड्याला एक वर्ष पुर्ण झाले.

त्यामुळे गेल्या २०-२५ दिवसापासुन रात्री १०च्या नंतर येनारा माझा नवरा काल

संध्याकाळी ७.४५ला कामापासुन मोकळा झाला व आम्ही ८ वाजता ओफीस मधुन बाहेर जाण्यासाठी निघालो.

बाहेर भरपुर फिरलो व नंतर भरपुर खाल्ले 🙂

खाल्लेले पचण्यास थोडासा हातभार लावावा म्हणुन झेड ब्रीज वर २-३ चक्कर लावली.

तेवढाच आपला पोटाला हातभार हा उदात्त हेतु.

एव्हाना पावसाने त्याच्या अस्तित्वाची दखल घेन्यास भाग पाडले व लवकरात लवकर आपले घर जवळ करावे

या हेतुने आम्ही पावसातच घरी जाण्यास निघालो आणी लवकरच पावसाने रौद्ररुप धारण करायला सुरुवात केलेली होती.

नवरोबाला म्हणाली की कुठेतरी थांबु या व पाउस थांबल्यावर घरी जाउया पण नवरोबा म्हणाला की लवकरात लवकर घरी जाउया उगाच पाउस अजुन वाढला तर पंचाईत होईल. तसेच पावसात भिजत निघालो (अर्थातच गाडीवर).

पावसाचा जोर खुप वाढलेला होता. घरी पोहोचायला जवळ्पास ४५मिनीट लागले. घरी पोहोचे पर्यंत चिंबचिंब भिजलेलो होतो सोबतच लाईटपण गेलेली होती.

बाहेर बघीतले तर पाउस अजुनच वाढलेला होता. वाटले बरे झाले घरी यायला निघालो ते जर थांबलो असतो तर अडकलो असतो (अर्थातच श्रेय नवरोबा).

पावसात पण भिजण्यात खुप मजा आली. नवरा म्हनाला पण आज तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण होत आहेत (बाहेर फिरायला जाणे, पावसात भिजणे…)

आमच्या साखरपुड्याच्यादिवशीपण पाउस आला होता….

एकंदतीर कालची संध्याकाळ खुप छान गेली………..

फसलेला केक

काल रवीवार असल्यामुळे काहीतरी नविन पदार्थ करावा असे वाटत होते.
बाहेर जान्याचा मुळीच विचार नव्हता कारण राम चा सोमवारी प्रोजेक्ट डेमो आहे.
त्यामुळे घरीच होते तर वेळेचा सदुपयोग म्हणुन केक करायला घेतला.
माय्क्रोव्हेव्ह ओवन मधे अजुनही एकदा केक करुन नाही बघितला त्यामुळे हा माझा पहिलाच
प्रयत्न होता.
तर केक चे सारन व्यवस्थित झालेले आहे असे दिसत होते.ओवन मधे केक चा मेनु सिलेक्ट केला आणी
केक एका छा प्लास्टीक च्या डब्यात ठेवला.पण २ मिनीटात भान्डे वाकडे तिकडे झालेले दिसले.माझा जीव भान्ड्यात पडला व
त्याला आत्यन्तीक दुख झाले.
शेवटी केक वोवन मधे दिलेल्या भान्ड्यामधे ठेवला पुन्हा १० मिनीटामधे ओवनच्या भान्द्याचे पण तेच हाल झाले.माझ्या मनाचे तर रडु रडु हाल झाले होते. 😦
शेवटी त्यातुन पण केक काढला आणी नोन स्टीक भान्ड्यात ठेवला व सोबत ओवनला म्हटले (मनातल्या मनात)की आता हे भान्डे खराब करुन दाखव तर मानेल 🙂
१० मिनीटाने केक काढला, भान्डे व्यवस्थीत होते (ओवन मला घाबरला 🙂 )
केक अगदिच सो सो झाला होता.
पण सगळ्यानी गोड मानुन खाल्ला………
🙂 🙂 🙂