सुन्या सुन्या महफिलीत माझ्या

खूप दिवसापासून ब्लॉग वर काहीही नाही लिहीले म्हणून आज विचार केला की काहीतरी लिहायचेच.
काहीतरी लिहायचे म्हणजे नेमके काय लिहायचे हा यक्ष प्रश्न होता.
विचार करतच होते, आणी माझी आवडती मराठी गाणी लावली.
आणी वेड्या लहरींचा पिंगा झाला सुरू......
आज बर्‍याच दिवासाने माझे आवडते गाणे ऐकत होते "सुन्या सुन्या महफिलीत माझ्या"
आणी सहजच प्रश्न पडला की आनंदी गाण्यापेक्षा दुखी, विरह गीते जास्त आवडतात, असे का?
सूर्यस्तापेक्षा सूर्योदय मनाला जास्त भावतो, कदाचीत सूर्योदय बघण्यासाठी कधी उठलेच नाही
त्यामुळे असेल(कोल्हयाला द्राक्ष आंबट :) )
"सुन्या सुन्या महफिलीत माझ्या" गाण्यातील एक एक शब्द आवडतो.
त्या गीतकार, संगीतकार, गायीकेला त्रिवार वंदन, स्मिता पाटील ला विसरून कसे चालेल.
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

आता मला अजुन काहीही लिहायच कन्ताळा आलेला आहे :)
सगळे अर्धवट लिहीले आहे. कळत आहे ते मला पण...
शेवटी हा ब्लॉग मला वाटेल ते लिहायसाठीच आहे. 
त्यामुळे माझे लिखाण व्यवस्थीततेच्या चौकटीत बसत नसले तरीही मला ते प्रिय आहे (माझेच शब्दरूपी बाळ आहे ते), हो ना?


वटपोर्णीमा मागच्या वर्षीची

शुक्रवारी(१०/०६/२०११) आम्ही दोघे घरच्यासाठी काही सामान आणायला गेलो होतो.
बल्ब आणायला गेलो तर त्या shopping complex च्या जवळ्च दत्ताचे मंदिर आहे व वडाचे झाड आहे (ज्याची पूजा करायला मी मागच्या वर्षी वटपोर्नीमेला गेले होते)
मागच्या वर्षी तिथे लकीdraw घेतला होता त्यात मला पैठणी मिळाली होती.
त्याची लिंक इथे आहे.

त्याचे फोटो तिथे मोठ्या होर्डिन्ग्वर लावलेले होते.

आपला फोटो होर्डिन्ग वर बघून खूप आनंद झाला.

This slideshow requires JavaScript.