पिल्लायन 7

Posted: मे 3, 2017 in सहजच

रात्री झोपतांनाचा संवाद

पात्र: आई अन साडे पाच वर्षाचे पिल्लु

पिल्लु झोपलेल्या आईच्या अंगावर चादर टाकतो

आई: कारे आज कशी काय चादर टाकली माझ्या अंगावर? मी चादर टाक म्हटली की म्हणतो, “सगळेच काम तु मला सांगतेस. तुझे काम तु करत जा”.

पिल्लु: आज मन झाले तुला खुश ठेवायचे

आई आनंदाने झोपी जाते.

माझा साडे पाच वर्षाचा मुलगा जवळपास एक महिन्यापासुन बाहुबली बघायला जाण्यासाठी मागे लागला होता. “कटप्पाने बाहुबलीला का मारले?” या प्रश्नाने जीव नकोसा केला होता. रोज दिवसातुन कित्येक वेळा हा प्रश्न विचारल्या जात होता. बाहुबली1 तर त्याच्या पाठ झाला होता, अगदी कालकेयाची भाषा सुदधा😀 बाहुबली 2चे ट्रेलर आल्यापासुन तर आम्हा नवरा बायकोच्या छळामध्ये वाढ झाली होती. युट्युबवर ट्रेलरची समीक्षा ऐकुन अर्धाअधीक अंदाज आला होता. बाहुबली, शिवगामी, बल्लालदेव, कटप्पा जणु माझ्या अवती भवती राहतात असे वाटु लागले होते

(अगं मम्मा,

1 शिवगामी सांगते कटप्पाला बाहुबलीला मारायला.

2 कटप्पाच्या ड्रेसवरचे चिन्ह बघ वेगळे होते

3 शिवगामी म्हणते अंतरयुद्ध आहे(याचा अर्थ नंतर कळला मला)

4 बल्लालदेव रेड्याला हरवतो. तो खुप ताकदवान असतो

असे बरेच वाक्य रोजच कानावर पडत होते)

शेवटी काल संध्याकाळी आम्ही बाहुबली2 बघायला गेलो.

घरी आल्यावर नवर्याने त्याला विचारले की कटप्पाने बाहुबलीला का मारले तर तो म्हणाला की शिवगामी ने कटप्पा ला बाहुबलीला मारायला लावले. आम्ही विचारले,”पन का?” त्यावर तो म्हणाला की कारण बल्लालदेवने शिवगामीला कनफ्युज केले.

यावर आम्ही दोघे चाटच पडलो. कुठुन शिकतो मोठे मोठे शब्द, देव जाणे😀

घरी रोज कमीत कमी दोन तिनदा टिशर्ट काढुन बकेट बाहुबली सारखी खांद्यावर घेने सुरु आहे.

सद्धया तरी अजुन काही प्रश्न आले नाही. म्हणजे पिल्लु खुश आहे.

आणी माझा जिव भांड्यात, आता पुढे काय😀