काम काम काम

आजच एका लग्न झालेल्या मैत्रिणीचा फोन आला.माझे लग्न जुळले आहे म्हटल्यावर सगळ्यात पहिले कुणीही हा प्रश्न विचारतात की फोन वर किती तास  बोलते.इतका जळफळाट होतो या प्रश्नाने की विचारू नका कारण सुरुवातीला(पहिले २०-२५ दिवस) दिवसातून २-३ तास बोलणारा माझा भावी नवरा आता दिवसातून जास्तीत जास्त ३० मी. बोलतो.कारण एकच खूप काम आहे,प्रोजेक्ट
रिलीज करायचा आहे,बग सोल्व् करायच्या आहेत …………
आणि तक्रार केली तर एकच उत्तर हे मी आपल्यासाठीच तर करत आहे.
भविष्य secure करण्यासाठी आपण आपला वर्तमान corrupt करत आहे
याचे काय?
अर्थात त्याचा पण नाइलाज असतो कारण कामाच इतके असते की मुळीच वेळ नसतो.इच्छा नसते असे नाही पण काम काम काम……………रात्री बोलायचे तर साहेब फोन वरच झोपून जातात आणि मग मी फोन बंद करते. 🙂
लग्नानंतर तर आमची आठवड्याच्या शेवटीच भेट होणार असे वाटते 🙂
कारण नंतर मी पण काम सुरू करणार आणि मी पण अशीच कामात व्यस्त होणार ….आजच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे एकमेकन वेळ पण देऊ शकत नाही आहे आपण. खरच वाटते की आपण काहीतरी गमावत आहोत या पैश्याच्या मागे लागून पण नाइलाज आहे कारण जो थांबला तो संपला अशी जगाची रीत आहे.