Posts Tagged ‘पाऊस’

पाऊस

Posted: जुलै 26, 2010 in पाऊस, सहजच
टॅगस्,

खुप पाउस पडत आहे पुण्यात आज.
छान वाटत आहे.
हवेत खुप गारवा आहे.
असे वाटते की घरी जावे(सध्या मी ओफ़िस मधे आहे),
मस्त गरम गरम कान्दा भजे खावे(पहीले करावे लागतील)
आणी नन्तर मस्त गरम गरम दुलई घेउन मन्द स्वरात हळुवार गाणी ऐकावी.
पण………..
पाउस असला तर मला मुम्बईची खुप आठ्वन येते कारण तिथे पावसाळ्यात हमखास २-३दा तरी घरी राहावे लागे ओफ़िसला सुट्टी असे
मला तर पावसात ओफ़िसला जायला खुपच आवडायचे.ओफ़िसमधे गर्दी कमी असायची आणी ओफ़िस लवकर सुटायचे.
मज्जा यायची भिजत भिजत घरी जायचे…..
काही रुतु हे आपल्याला भुतकाळाच्या आठवणीमधे घेउन जातात.जसा हा पावसाळा….
प्रत्येकालाच आपला भुतकाळातील आठवणी पावसाळ्यात आठवत असतील असे मला वाटते.
ते डबक्यामधे कागदाच्या बोटी टाकणे,
भिजत भिजत शाळा, कोलेज मधे जाणे,
शाळेला दान्डी मारने तेही घरच्यान्च्या परवानगीने,
शाळेतुन लवकर परत येणे,
पावसाळी सहलीला जाणे………
अश्या अजुन कितीतरी आठवणी आज पावसाळ्यातील भुछत्राप्रमाणे डोके वर काढत आहे….

पाऊस…

Posted: जून 10, 2010 in पाऊस
टॅगस्,

का माहिती पण मला पऊस खुपच आवडतो.
पावसात भिजने, गरम गरम पदार्थ खाने नन्तर गरम गरम दुलईत पडुन राहणे आवडती गाणी मन्द मन्द आवाजात ऐकत…
अर्थात असा आनन्द मला नेहमीच मिळतो असे नाही पण मला स्वप्न बघायला कुठे पैसे मोजावे लागतात….
अशीच पावसाची मला आवडलेली कवीता……

पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.

कवी – सौमित्र