मॉर्निंग वॉक 2

आठवड्याचे १-२ दिवस सोडले तर मी नियमीत पणे मॉर्निंग वॉक ला जाते 🙂
तर आज बर्‍यापैकी पार्क मधे फिरल्यावर तिथेच बसून थोडा आराम करायचे ठरवले व एका बाका वर स्थानापन्न झाले.सोबत कानात मोबाईल नामक यंत्रा मधून सुश्राव्य 🙂 गाणी ऐकत होते व मग काही काम नसले की आपण दुसरे काय काम करतात हे बघण्याचे काम करत असतो तर दुसर्‍याणा बघण्याचे 🙂 काम करायला सुरूवात केली कारण पु.ल. नि म्हटलेच आहे की जिवंत लोकाना बघण्याइतका चांगला जगात दुसरा टाइमपास नाही आहे. खरच मनापासून पटते की काही काम नसेल तर लोकाना बघावे प्रत्येकाची वेगळी तरहा, वेगळी चाल……

लोकाना बघण्यात एक वेगळीच मजा असते आनंद असतो.हसतील मला की ही वेडी काहीपण म्हणते पण निवंतपणे लोकाना बघा व त्यांच्या चेहरायावरचे हावभाव टिपाण्याचा प्रयत्‍न करावा व आपल्याच मनाप्रमाणे प्रत्येकाला analyze करून पाहावे.
वेगळाच अनुभव येतो ……