केळ्वण

kelwan फेब्रुअरी मधे लग्न असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे हळुहळू केळ्वणा ला बोलावणे यायला लागले आहे. नोकरी सोडल्यामुळे तशी मी घरीच आहे  🙂  पण बोलावणारे पण घरी असायला हवे ना.तर मुंबईतला माझा stay आता काहीच दिवस असल्यामुळे रविवारी ठाण्यला आते बहीण राहते तिच्या घरी केळ्वणा ला बोलावणे आहे.मजा वाटत होती सोबत excitement पण होती.

लग्न होणार म्हणून आता मी काहीतरी विशेष व्यक्ती आहे असे मला भासत आहे निदान नातेवाईक तरी तसे भासवत होते.उदा. काहीही चुकले तर ओरडाणारे नातेवाईक जाउ दे आता किती दिवस अशी वागणार आहे ती वगेरे वगेरे म्हणत होते.त्यामुळे घरात सद्ध्या सन्माननीय व्यक्ती 🙂 झालेली आहे.मजा वाटत आहे.कारण अजूनही जबाबदारी ची जाणीव झालेली नसल्यामुळे मुक्तपणे आयुष्य उपभोगणे सुरू आहे(वास्तवाचे चटके बसतच नाही आहे आई बाबांच्या मायेच्या सावलीमुळे) असो….तर आता आमचे केळ्वण हाद डने सुरू आहे सोबत morning walk पण सुरू आहे,balance नको का करायला…..कधी कधी विचार येतो की अमरावतीला घरी गेल्यावर तर रोजच केळ्वण  राहतील आणि आमचे खाणे तर uncontrolled आहे.जर असे झाले तर लग्न होईपर्यंत वजन नक्कीच दुप्पट होणार आणि भावी
नवरा भरपूर शिव्या घालणार.जाउ देत पुढचे पुढे”भविष्याचा विचार करून वर्तमान कशाला खराब करायचे
सद्ध्या तरी मज्जा नि life 🙂 🙂 🙂