आम्‍लेट

काल जुनी डायरी हातात घेतली.
बरेच दिवसांपासुन विचार करत होते की डायरी वाचायची पण वेळच मिळत नव्हता.काल खुप वेळ होता असे नाही पण रात्री घर आवरता आवरता सहज लक्श डायरी कडॆ गेले.
चाळता चाळता लक्श माझ्या आवडत्या कवितेकडॆ गेले.मंगेश पाडगावकरांची आम्लेट.
ती कविता इथे देत आहे….

आम्‍लेट
कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली,” पिल्‍लूबाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले,” आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

– मंगेश पाडगावकर

अगदी रीअलेस्टीक आहे ना कविता…..
मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता आहे ही…….
माझा भाउ मला ही कविता वाचायला लावायचा.तो म्हणायचा की मी खुप छान वाचते ही कविता. महिन्यातुन एकदा कविता वाचन चा कार्यक्रम असायचा आमचा.आता तर जवळपास नउ-दहा महिन्यांनंतर डायरी हातात घेतली.काळाप्रमाणे किती बदलतो आपण.
का बदलतो?
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी रोज मर मर मरतो आणी जगायचे विसरुन जातो.

मनाला भावलेले काहीतरी

आज खुप सुंदर मेल आला होता.
त्यात व.पु. चे काही निवडक व्याक्य होती.
मनापासुन आवडली व सगळ्यांना सांगाविसी वाटली……
किती सुंदर आहे…खरच…समोरच्या व्यक्तीनं तुमच्यासारखं का व्हाव?
आणी आपण अविरत प्रयत्न करत असतो समोरच्याला बदलन्याचा, प्रवाहाविरुद्ध पोहन्यास प्रव्रुत्त करायचा प्रयत्न……
(ही वाक्य व.पु.ची आहे की नाही हे मी पडताळुन पाहिलेले नाही)