पुन्हा कर्दे……………

ओफिसची कर्दे (ता.दपोली, जि.रत्नागिरी) येथे २१ व २२ ला सहल गेली होती.
नवरोबा व माझे एकच ओफिस असल्यामुळे दोघेही जानारच होतो अथवा सहल अरेन्ज करण्यातपण दोघांचा सहभाग होता.
अनेक संकटांना पार करुन आम्ही शनिवारी सहलीला जायला निघालो.
शुक्रवार रात्री पर्यंत जायचे की नाही जायचे हेच निश्चीत नव्हते कारण शुक्रवारी प्रोजेक्ट डेमो होते.हे पहीले संकट होते……
शेवटी ओफिसचे काम हेच पहीले कर्तव्य होते पण सगळे प्रोजेक्ट डेमो व्यवस्थीत पार पडले आणी आमचे सहलीला जायचे निश्चीत झाले.
पहीले संकट पार झाले.
सुरुवातीला तर सहलीला जान्यासाठी १६ जण तैयार होते, त्यामुले १७ जणाला घेउन जाईल अशी त्रावेलर गाडी बुक केली पण शुक्रवार रात्री पर्यंत फ़क्त १२ जणच जान्यासाठी तैयार होते.हे दुसरे संकट होते…………….
शेवटी १२ जणांनी थोडे जास्त पैसे भरायची तैयारी केली व १२ जणांनीच जायचे हे ठरवले, दुसरे संकट  पार केले.
आणी शनिवारी सकाळी ८.३५ वाजता गणपती बाप्पाचे नाव घेतले व आमची गाडी पुण्यातुन निघाली.
हळुहळु गाडी ताम्हीनी घाटातुन जायला लागली….
बाहेर निसर्गाची मुक्त उधळन होती आणी गाडीत मस्ती सुरु झालेली होती.
जसजशी गाडी पुढे पुढे सरकत होती तसतसे मन बाहेरचा हिरवा निसर्ग बघुन त्रुप्त होत होते.
जाताना ताम्हनी घाटातुन जात होतो मधेच धबधबे दिसत होते. शेवटी न राहवुन आम्ही एका धबधब्याजवळ थांबलो.भरपुर मस्ती केली.
बाहेरची हिरवळ बघुन खुपच प्रसंन्न वाटत होते.पुण्याच्या रोजच्या आयुष्यात इतकी हिरवळ दिसत नाही ना त्यामुळे ती निसर्गाची हिरवी धुळ्वड डोळयांनी किती पिउ अन किती नाही असे होत होते.
गाडीत सुद्धा भर्पुर मस्ती सुरु होती.
दुपारी २ वाजता दापोलीला पोहोचलो.सगळ्यांनाच खुप भुक लागली होती त्यामुळे पहिले पोटोबा केला कोकणात जवळ्पास सगळेच होटेल हे शाकाहारी व मासाहारी दिसले.जिथे जेवण केले ते पण तसेच होते त्यामुळे काय खायचे हा माझ्यासमोर यक्श्प्रश्न होता. शेवटी थालीपिठ घेतले.जेवण झाल्यावर कर्दे ला जायला निघालो.आता सगळ्यांना समुद्र बघन्याची घाइ झालेली होती.जवळपास ३.३० वाजता आम्ही करदे ला पोहोचलो.दापोलीवरुन कर्देला जाताना आजुबाजुला छान झाडी मधेच भाताची छोटी छोटी शेते, झाडांमधुन दिसणारे कौलारु घरे, कोंबड्या, गाई, म्हशी व कुत्रे सगळीकडेच चैतन्य वाटत होते.
कर्दे ला पोहोचलो, राहन्याची आधिच व्यवस्था केलेली होती त्यामुळे सगळ्यांनी पटापट कपडे बदलले व सगळे धावतच समुद्रकिनार्याकडे निघाले.
रात्र होईपर्यंत समुद्रात डुंबलो.सगळे खुप थकले होते.रात्री जेवण झाल्यावर पुन्हा समुद्र किनार्यावर फिरायला गेलो.मला रात्री समुद्रातील लाटांच्या आवाजची खुपच भिती वाटते.
सगळे सोबत होतो त्यामुळे काही नाही वाटले.
रात्रीतर खुप हात पाय दुखत होते कारण पान्यात खुप वेळ डुंबलो ना असो…
सकाली उठुन पुन्हा समुद्रावर आंघोळ करायला जायची घाई होती.सकाळी ९ वाजता समुद्रावर गेलो ते दुपारी१ वाजता रुमवर परत आलो.
सगळ्यांना खुप भुक लागली होती. श्रावण असल्यामुळे शाकाहारीच जेवण होते.त्यामुळे मला खुप बरे वाटत होते.कारण दुसर्याला मांसाहार करताना अजुनतरी बघितले नाही आणी बघितले तर एकतर उलटी तरी करेल नाहीतर स्वत:जेवणार तरी नाही……
बापरे..कसे खातात लोक दुसर्या प्राण्याला हेच कळत नाही.माहेरी सगळे शुद्ध शाकाहारी होते आणी मला स्वत:ला मांसाहाराची किळस येते त्यामुळे असे कुठे बाहेर जायचे म्हट्ले की टेंशन येते.असो…….
सोबतच्या बर्याच लोकांची सुवर्णदुर्ग बघायची खुप ईच्छा होती पण सोबतच्या काही लोकांच्या विरोधामुळे ते राहीले.उगाच मनाला थोडी रुख रुख लागुन राहीली की सुवर्णदुर्ग बघायला मिळाला असता तर अजुन मजा आली असती, पुन्हा पुन्हा थोडे जातो आपण. माझीपण खुप ईच्छा होती पण ग्रुप म्हटला की सगळ्यांचे ऐकावेच लागते.
रात्री १२ वाजता पुण्यात परत आलो.
आता लिहायचा खुपच कंटाळा आलेला  आहे त्यामुळे लिहीणे थांबवते…..

This slideshow requires JavaScript.

केळशी, कर्दे …अविस्मरणीय अनुभव

लग्नानंतर आम्ही कुठेही फिरायला गेलो नव्हतो म्हणून नवर्याने त्याच्या व्यस्त कार्यक्रममधून वेल काढला व आम्ही
दोघे ३ एप्रिल ला केळशी बीच (कोकण)ला गेलो.
अविस्मरणीय अनुभव होता तो………
Kelashi Beachपहिले दीड दिवस केळशी ला राहिल्यावर आम्ही कर्दे बीच ला गेलो.
केळशी वरुन कर्दे ला जाण्याचा अनुभव तर शब्दातीत होता.
उजव्या बाजूला समुद्र व डाव्या बाजूला उंच डोंगर………

मधेच एखादी खाडी दिसायाची. कुठून दुरुनच झाडा मधून समुद्राचे दर्शन व्हायचे…
समुद्राचा तर लपंडावच सुरू होता.
खूप आनंद घेतला त्या प्रवासाचा………

काय लिहु अन्  काय नाही असे होत आहे आणि काहीच व्यवस्थित लिहिल्या जात नाही आहे.
काही काही अनुभव सांगताना शब्द पण अपुरे पडतात…….
असेच माझे झलेले आहे…