माडी पोर्णिमा

आज माडी पोर्णिमा आहे.गावी असते तर मस्त संध्याकाळी घरी बाहुल्या बसविल्या असत्या.आता आजुबाजुला कुणीही लहान राहत नाही. त्यामुळे बाहुलीचे गाणे आई, मी, बाजुच्या काकु व त्यांच्या ३ सुना यांनी मिळुन म्हटले असते.आम्ही नेहमीच खुप मजा करत असु या दिवशी.आई खुप छान छान खाउ करायची. अगदी भरपेट द्यायची.सोबत ते ५-६ जणींचे मिळुन गाणे म्हणने. ति गाणी वर्षातुन फ़क्त एकदाच म्हटली जातात त्यामुळे एखादे गाणे विसरुन जायचे व पुढचे यायचेच नाही. मग ते गाणे तसेच मधे सोडुन नविन गाणे सुरु करायचो सोबत आई आणी काकुंचे त्यांच्या बालपणातील गाण्यांची सोबत असायची अश्या कितीतरी आठ्वणींनी मन भरुन आलेले आहे. असे वाटत आहे की नोकरीच्या नादात आपण खुप मोठा आनंद गमावत आहे. मला तरी या छोट्या छोट्या सणांची माहिती आहे पण माझ्या पुढच्या पिढीला हा आनंद नाही मिळनार.

हळुहळु ती गाणी मनात येत आहे.

पहिली ग पुजा बाई,

कारल्याचे बी पेर ग सुन बाई,

या डवरा या राणी रुसुन बैसली कैसी (माझे आवडते गाणे),

एक लिंब झेलु बाई दोन लिंब झेलु,

अडकित जाउ खिडकित जाउ,

हत्तीच्या सोंडेवर पेरीला नगरअशी अजुन कितीतरी गाणी आहेत.

ही गाणी कुठे वाचुन पाठ नाही झाली तर ती तशीच पिढ्या न पिढ्या हस्तांतरीत(?) झालेले आहे त्यामुळे त्यांच्या उच्चारांमधे चुका आहेत पण ज्या लयीत ते म्हटले जाते ती लयच खुप सुंदर वाटते.
खुप लिहावेसे वाटत आहे पण मन भरुन आलेले आहे घरच्या आठ्वणींनी 😦 😦 😦