साखरपुड्याचा पहिला वाढदिवस

काल आमच्या साखरपुड्याला एक वर्ष पुर्ण झाले.

त्यामुळे गेल्या २०-२५ दिवसापासुन रात्री १०च्या नंतर येनारा माझा नवरा काल

संध्याकाळी ७.४५ला कामापासुन मोकळा झाला व आम्ही ८ वाजता ओफीस मधुन बाहेर जाण्यासाठी निघालो.

बाहेर भरपुर फिरलो व नंतर भरपुर खाल्ले 🙂

खाल्लेले पचण्यास थोडासा हातभार लावावा म्हणुन झेड ब्रीज वर २-३ चक्कर लावली.

तेवढाच आपला पोटाला हातभार हा उदात्त हेतु.

एव्हाना पावसाने त्याच्या अस्तित्वाची दखल घेन्यास भाग पाडले व लवकरात लवकर आपले घर जवळ करावे

या हेतुने आम्ही पावसातच घरी जाण्यास निघालो आणी लवकरच पावसाने रौद्ररुप धारण करायला सुरुवात केलेली होती.

नवरोबाला म्हणाली की कुठेतरी थांबु या व पाउस थांबल्यावर घरी जाउया पण नवरोबा म्हणाला की लवकरात लवकर घरी जाउया उगाच पाउस अजुन वाढला तर पंचाईत होईल. तसेच पावसात भिजत निघालो (अर्थातच गाडीवर).

पावसाचा जोर खुप वाढलेला होता. घरी पोहोचायला जवळ्पास ४५मिनीट लागले. घरी पोहोचे पर्यंत चिंबचिंब भिजलेलो होतो सोबतच लाईटपण गेलेली होती.

बाहेर बघीतले तर पाउस अजुनच वाढलेला होता. वाटले बरे झाले घरी यायला निघालो ते जर थांबलो असतो तर अडकलो असतो (अर्थातच श्रेय नवरोबा).

पावसात पण भिजण्यात खुप मजा आली. नवरा म्हनाला पण आज तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण होत आहेत (बाहेर फिरायला जाणे, पावसात भिजणे…)

आमच्या साखरपुड्याच्यादिवशीपण पाउस आला होता….

एकंदतीर कालची संध्याकाळ खुप छान गेली………..