2012 माझा अनुभव

काल २०१२ हा ईंग्लिश सिनेमा बघितला.
चांगला म्हणावा की वाईट हेच कळेना.
२१ डिसेंबर२०१२ ला पृथ्वी वर प्रलय येणार आणि त्या पासून लोकाना वाचविण्यासाठी शास्त्राज्ञ यांचे प्रयन्त अशी जवळपास सिनेमाची मध्यवर्ती कल्पना आहे.
मल्टिप्लेक्स मधे तिकीट काढल्यामुळे सिनेमा बरा आहे असे म्हणावे लागले
कारण त्यातले काहीच बुद्धीला पटत नव्हते..ना इमोशल ड्रामा जमला होता,ना टेक्निकल,…

सगळीकडे सिनेमा संपवण्याची घाई झालेली आहे असे वाटत होते.
सगळ्यात खटाकलेली गोष्ट म्हणजे सगळ्या जगातल्या मुख्य देशांची नावे घेण्यात आली पण भारताचे कुठेही नाव घेतले नाही.जागतिक महत्वाच्या निर्णायामधे भारताला कुठेही स्थान देण्यात आले नाही.तिथेच त्या सिनेमा बद्दल एक मनात आधी निर्माण झाली.
त्यात सांगितले की प्रलय येणार हे पहिले एका भारतीय शास्त्राज्ञाल कळले पण
नंतर कुठेही चुकुनही भारताचा उल्लेख नाही.

त्यातील काही भाग हा भारतीय पुराणातील कथा श्री विष्णूचा मस्य अवतार या काथेशी साधर्म्य साधतो असे वाटते(प्रलयात टिकणारे जहाज).
मला स्वता चा खूप चांगला अनुभव नव्हता.त्यापेक्षा “तुम मिले” बघितला असता तर ३ तास पूर्ण मनोरंजन झाले असते व २०१२ नंतर घरीच बघितला असता तर चांगले झाले असते असे वाटते.